Manish Jadhav
टीम इंडियाला नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत विराट कोहलीची बॅट पूर्णपणे शांत राहिली.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पण बाबर आझम या मालिकेत फलंदाज म्हणून खूप यशस्वी ठरला.
नुकतीच आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर झाली, ज्यामध्ये आफ्रिकेविरुद्धच्या दमदार कामगिरीचा पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझमला मोठा फायदा झाला.
बाबर कसोटीत फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीच्या खूप पुढे गेला आहे.
बाबरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 4 डावात 48.25 च्या सरासरीने 193 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 3 अर्धशतकेही झळकावली. याचाच फायदा त्याला आयसीसी कसोटी क्रमवारीत झाला. तो आता 12व्या स्थानी पोहोचला.
बाबरचे आता रेटिंग गुण 697 एवढे झाले आहेत. या मालिकेपूर्वी बाबर टॉप-20 फलंदाजांच्या यादीतही नव्हता.
विराट आता आयसीसी कसोटी क्रमवारीत तीन स्थानांनी घसरला आहे. तो आता 27व्या स्थानी पोहोचला.