I League
Churchill Brothers Vs Real KashmirDainik Gomantak

I League: चर्चिल ब्रदर्स पुन्हा अग्रस्थानी, रियल काश्मीरवर 3-1 फरकाने मात

Churchill Brothers Vs Real Kashmir: चर्चिल ब्रदर्सने रियल काश्मीरवर ३-१ असा चमकदार विजय मिळवून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पुन्हा अग्रस्थान पटकावले.
Published on

I League Churchill Brothers Vs Real Kashmir

पणजी: चर्चिल ब्रदर्सने रियल काश्मीरवर ३-१ असा चमकदार विजय मिळवून आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पुन्हा अग्रस्थान पटकावले. आता त्यांच्यात व दुसऱ्या क्रमांकावरील नामधारी एफसी यांच्यात एका गुणाचा फरक आहे.

राय पंचायत मैदानावर झालेल्या लढतीत चर्चिल ब्रदर्ससाठी निश्चल चंदन (७वे मिनिट), अनिल गावकर (२१वे मिनिट) व ट्रिजॉय डायस (७९वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पाहुण्या रियल काश्मीरसाठी एकमेव गोल २७व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर पावलो सीझर याने नोंदविला. चर्चिल ब्रदर्सचा हा स्पर्धेतील सातवा विजय ठरला.

I League
I League: 'धेंपो'ला चिंता गोल नोंदवण्याची, दिल्लीसमोर कामगिरी उंचावायची नामी संधी

त्यांचे आता २२ गुण झाले आहेत. नामधारी एफसीच्या खाती २१ गुण आहेत. रियल काश्मीरला तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ११ लढतीनंतर त्यांचे १६ गुण कायम राहिले. मागील लढतीत श्रीनगर येथे धेंपो क्लबला पराभूत केलेल्या काश्मीरमधील संघाला गोव्यातील हवामानात सूर गवसला नाही.

I League
I League Football: धेंपो क्लबच्या ‘सुपर सब’ची कमाल! दिल्ली एफसीविरोधात नोंदवला शानदार विजय; नेस्टरचा गोल ठरला निर्णायक

दिमित्रिस दिमित्रियू यांच्या मार्गदर्शनाखालील चर्चिल ब्रदर्सने अगोदरच्या लढतीत राजस्थान युनायटेडविरुद्ध पत्करलेल्या धक्कादायक पराभवातून सावरण्यात यश मिळविले. सुरवातीच्या २१ मिनिटांत दोन गोलची आघाडी घेतल्यानंतर त्यांनी सामन्यावरील पकड ढिली होऊ दिली नाही. चर्चिल ब्रदर्सचा स्पर्धेतील पुढील सामना तीन फेब्रुवारीस राय मैदानावर स्पोर्टिंग क्लब बंगळूरविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com