I League: 'धेंपो'ला चिंता गोल नोंदवण्याची, दिल्लीसमोर कामगिरी उंचावायची नामी संधी

Dempo Club Vs Delhi FC: धेंपो क्लबने १० सामन्यांतून तीन विजय, दोन बरोबरी व पाच पराभवांसह ११ गुणांची कमाई केली आहे.
Dempo Club Football Match
Dempo Club Vs Namdhari FCDainik Gomantak
Published on
Updated on

I League Dempo Club Vs Delhi FC

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबचे मुख्य प्रशिक्षक समीर नाईक आपल्या संघाच्या बचावफळीतील कामगिरीवर खूष आहेत, परंतु संधी निर्माण करूनही आक्रमणात गोल होत नसल्याबद्दल चिंतित आहेत. या पार्श्वभूमीवर आय-लीग फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्यांची बुधवारी (ता. २९) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दिल्ली एफसीविरुद्ध लढत होईल.

धेंपो क्लबने १० सामन्यांतून तीन विजय, दोन बरोबरी व पाच पराभवांसह ११ गुणांची कमाई केली आहे. प्रतिस्पर्धी दिल्ली एफसी संघही सातत्यात कमी असून १० सामन्यांतून दोन विजय, तीन बरोबरी व पाच पराभवांसह त्यांच्या खाती नऊ गुण आहेत. धेंपो क्लबला मागील पाच सामन्यांतून फक्त एकाच गुणाची कमाई करता आली, तर दिल्लीने लागोपाठ दोन सामने गमावले आहे. धेंपो क्लबला अगोदरच्या लढतीत श्रीनगर येथे रियल काश्मीरकडून २-० फरकाने पराभव पत्करावा लागला, तर दिल्ली एफसीला ऐजॉल एफसीने ४-२ असे हरविले.

Dempo Club Football Match
I League Football: धेंपो क्लब, राजस्थान सामना सुटला बरोबरीत! निर्णायक क्षणी गोलरक्षक आशिषने अडवला पेनल्टी फटका

धेंपो क्लबने स्पर्धेतील दहा सामन्यात फक्त सहा गोल नोंदविले, तर १० गोल स्वीकारले आहेत. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत धेंपो क्लबचे प्रशिक्षक समीर म्हणाले, की ``बचावफळीबाबत मला चिंता नाही. आम्ही कमी गोल स्वीकारताना चार क्लीन शीट्स राखल्या आहेत. संधी निर्माण करत असताना असताना आम्ही गोल नोंदविणे आवश्यक आहे.``

Dempo Club Football Match
ISL 2024-25: चुरस वाढली! अपराजित FC Goaची 'शिल्ड'वर नजर; 'चेन्नईयीन'विरुद्धचा सामना ठरणार निर्णायक

समीर यांनी सांगितले, की ``संघातील परदेशी खेळाडूंना स्थिरावण्यासाठी निश्चितच थोडा अवधी लागेल. आम्ही सर्वोत्तम कामगिरीसह विजयासाठी निश्चितच प्रयत्नशील आहोत. अगोदरच्या सामन्यांत अखेरच्या टप्प्यात आम्ही सामने गमावले, कदाचित सामन्यातील एकाग्रता गमावल्यामुळे किंवा प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्यामुळे हे घडले असावे. आमच्या संघातील नवोदित खेळाडू युवा आणि अननुभवी आहेत. संघात दुखापतग्रस्त खेळाडू आहेत. तरीही माझा स्थानिक खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. परदेशी खेळाडू बदलत असले, तरी आमचा लढाऊ बाणा कायम आहे.``

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com