IND W vs IRE W: स्मृती-प्रतिकाचं वादळ! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदा ओलांडला 400 धावांचा टप्पा
Smriti Mandhana & Pratika RawalDainik Gomantak

IND W vs IRE W: स्मृती-प्रतिकाचं वादळ! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदा ओलांडला 400 धावांचा टप्पा

Indian Women's Cricket Team 400 Runs: भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात इतिहास रचला. टीम इंडियाने वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा गाठला.
Published on

भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात इतिहास रचला. टीम इंडियाने वन-डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा गाठला.

भारताची याआधीची सर्वोच्च धावसंख्या 370 धावा होती, परंतु राजकोटच्या मैदानावर स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर टीम इंडियाने 400 धावांचा टप्पा गाठला.

विशेष म्हणजे, भारताने केवळ 46 षटकांत 400 धावांचा टप्पा ओलांडला. भारतीय महिला संघासाठी हा सामना ऐतिहासिक ठरला. कारण या वन-डे सामन्यात 400 धावांचा टप्पा ओलांडणारा टीम इंडिया पहिला आशियाई संघ बनला.

महिला क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा किती वेळा ओलांडला?

महिला क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने 400 चा टप्पा गाठण्याची ही सहावी वेळ आहे. न्यूझीलंडने चार वेळा वन-डे सामन्यांमध्ये 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने हा पराक्रम फक्त एकदाच केला आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा ओलांडणारा टीम इंडिया हा पहिला आशियाई संघ आहे. विशेष म्हणजे आयर्लंडविरुद्ध 400 चा आकडा चार वेळा गाठला गेला आहे. डेन्मार्कविरुद्ध एकदा आणि पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) एकदा 400 पेक्षा जास्त धावसंख्या झाली आहे. टीम इंडियाने सलग दोन सामन्यांमध्ये 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत; भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. न्यूझीलंडने सलग तीन वेळा वन-डे सामन्यांमध्ये 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

IND W vs IRE W: स्मृती-प्रतिकाचं वादळ! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदा ओलांडला 400 धावांचा टप्पा
IND vs ENG: W,W,W... द्रविडचा कानमंत्र अन् आकाशचा भेदक मारा, तासाभरातच 3 विकेट्स घेत इंग्लंडचं वाढवलं टेन्शन

टीम इंडियाने 72 तासांत आपला रेकॉर्ड मोडला!

12 जानेवारी रोजी आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात टीम इंडियाने 370 धावा केल्या होत्या, जी त्यांची वन-डे सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती, परंतु फक्त 72 तासांत टीम इंडियाने हा रेकॉर्ड मोडला. सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी टीम इंडियाला 400 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिकाने 129 चेंडूत 154 धावांची खेळी खेळली. हे तिचे वन-डेमधील पहिले शतक आहे. तर कर्णधार स्मृतीने फक्त 80 चेंडूत 135 धावांची तूफानी खेळी खेळली. विशेष म्हणजे, स्मृतीने केवळ 70 चेंडूत शतक झळकावले. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारी स्मृती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.

IND W vs IRE W: स्मृती-प्रतिकाचं वादळ! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदा ओलांडला 400 धावांचा टप्पा
IND-W vs ENG-W: भारतीय पोरींची कमाल! दीप्ती शर्माच्या जाळ्यात अडकले इंग्लिश फलंदाज

आयर्लंडविरुद्ध 435 धावा केल्या

आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाने 50 षटकांत 435 धावांचा डोंगर उभारला. स्मृती-प्रतिका जोडीने शतकांव्यतिरिक्त, यष्टिरक्षक ऋचा घोषने 59 धावा केल्या. टीम इंडियाने आपल्या डावात एकूण 9 षटकार आणि 48 चौकार लगावले. आयर्लंडने खूपच खराब गोलंदाजी केली आणि 29 अतिरिक्त धावाही दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com