Team India Squad T20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा; ईशान किशनचं कमबॅक, गिलचा पत्ता कट

Team India Squad T20 World Cup: बीसीसीआयने आज २० डिसेंबर रोजी निवड समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.
Team India Squad T20 World Cup
Team India Squad T20 World CupDainik Gomantak
Published on
Updated on

बीसीसीआयने आज २० डिसेंबर रोजी निवड समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे, सूर्यकुमार यादवकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मात्र, या निवडीत सर्वात मोठा धक्का म्हणजे सलामीवीर शुभमन गिलला संघातून वगळण्यात आले आहे. गिलच्या अनुपस्थितीत आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवड समितीने तरुण रक्ताला प्राधान्य देत अनुभवी खेळाडूंसोबत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलेल्या तुफानी कामगिरीचे फळ ईशान किशनला मिळाले असून त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनसोबत ईशानलाही संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, स्फोटक फलंदाज रिंकू सिंग पुन्हा एकदा विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

जितेश शर्माला संघात स्थान मिळवता आले नाही, ही चाहत्यांसाठी आश्चर्याची बाब ठरली आहे. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या समावेशामुळे संघाची फलंदाजी अधिक खोल आणि मजबूत झाली आहे.

Team India Squad T20 World Cup
Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

गोलंदाजी

वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि युवा हर्षित राणा यांच्यावर असेल. फिरकी विभागात कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे मुख्य अस्त्र असतील, तर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल अष्टपैलू भूमिका पार पाडतील.

हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्यावर फिनिशर म्हणून मोठी जबाबदारी असणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा टीम इंडियासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Team India Squad T20 World Cup
Goa ZP Election 2025: फोंडा तालुक्यातील कौल कोणाच्या बाजूने? भाजपची प्रतिष्ठा पणाला; विधानसभेची रंगीत तालीम

टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, ईशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com