Goa Cricket: रोमहर्षक सामन्यात गोव्याचा विजय! सुपर ओव्हरमध्ये कर्नाटकवर मात; 19 वर्षाखालील संघाची धडाकेबाज कामगिरी

Goa Vs Karnataka: गोव्याने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) १९ वर्षांखालील चौरंगी साखळी क्रिकेट स्पर्धेत शनिवारी रोमहर्षक विजय नोंदविला.
Goa Cricket News
Goa Cricket NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) १९ वर्षांखालील चौरंगी साखळी क्रिकेट स्पर्धेत शनिवारी रोमहर्षक विजय नोंदविला. टाय लढतीत त्यांनी केएससीए ब संघावर सुपर ओव्हरमध्ये मात केली. सामना अळूर येथे झाला.

केएससीए ब संघाने ४८.१ षटकांत सर्वबाद २६६ धावा केल्या. गोव्यातर्फे पियुष देविदास याने चार गडी बाद केले. नंतर आदित्य कोटा याचे शतक व यश कसवणकर याचे अर्धशतकामुळे गोव्याने ४ बाद २६६ धावा केल्याने सामना टाय झाला.

Goa Cricket News
USA Cricket Board Suspended: पाकिस्तानची दाणादाण उडवणाऱ्या अमेरिका संघाला ICC चा दणका, सदस्यत्व केलं निलंबित; 'हे' ठरलं कारण

सुपर ओव्हरमध्ये पियुष गोव्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. केएससीए ब संघासमोर ११ धावांचे लक्ष्य होते. या षटकात पियुषने फक्त चार धावा देताना एक गडी बाद केला.

Goa Cricket News
Cricketer Retirement: क्रिकेटला अलविदा! वकील होण्यासाठी 'या' स्टार खेळाडूनं घेतला निवृत्तीचा निर्णय, क्रीडाविश्वात खळबळ

संक्षिप्त धावफलक : केएससीए ब ः ४८.१ षटकांत सर्वबाद २६६ (अन्वय द्रविड ६६, वरुण पटेल १००, वासव व्यंकटेश ३५, व्यंकट चिरुगुपती ९-०-३५-१, पियुष देविदास १०-०-४२-४, अनुज यादव १०-०-७४-१, यश कसवणकर ९.१-०-५४-१, शिवेन बोरकर १०-०-५९-१) टाय विरुद्ध गोवा १९ वर्षांखालील ः ५० षटकांत ४ बाद २६६ (आदित्य कोटा १४५, यश कसवणकर ८४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com