Women's U-15 Cricket: गोव्याला 35 षटके फलंदाजीचे समाधान, जोया मीरचे अर्धशतक; पाचव्या पराभवासह मोहीम आटोपली

Goa U-15 women's cricket 5th defeat: महिलांच्या १५ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील गोव्याच्या मोहीम सलग पाचव्या पराभवासह संपली.
Women's U-15 Cricket
Women's U-15 CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महिलांच्या १५ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील गोव्याच्या मोहीम सलग पाचव्या पराभवासह संपली. शनिवारी त्यांना पंजाबने ९८ धावांनी हरविले. आंध्र प्रदेशमधील विझियानगरम येथे एलिट गट सामना झाला.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २२९ धावा केल्या. त्यानंतर गोव्याने निर्धारित ३५ षटके फलंदाजी करताना ४ बाद १३१ धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावरील बॅटर जोया मीर हिचे सलग दुसऱ्या सामन्यातील अर्धशतक गोव्यासाठी उल्लेखनीय ठरले. तिने ८३ चेंडूंचा सामना करताना १४ चौकारांसह ७० धावा केल्या. गोव्याची कर्णधार आर्या परब हिनेही छाप पाडताना ६३ चेंडूंत नाबाद २४ धावा केल्या.

Women's U-15 Cricket
Goa Police Recruitment: उपनिरीक्षक पदांसाठीची अंतिम सीबीटी 25 रोजी, परीक्षेसाठी दोन्ही जिल्‍ह्यांतील केंद्रेही निश्‍चित

संक्षिप्त धावफलक

पंजाब ः ३५ षटकांत ८ बाद २२९ (निष्ठा ७३, जयस्मीत कौर २२, वर्षा राणी ३५, गुणसखी ३२, विदिका सावंत ५-०-३७-०, किमया देसाई ५-०-२९-१, श्रीश्तिका शिवारकर ७-०-२९-१, कनक कोमरपंत १-०-११-०, पूजा कलेल ५-०-४३-१, आर्या परब ६-०-३३-१, निर्मिती खानविलकर ६-०-४५-२) वि. वि. गोवा ः ३५ षटकांत ४ बाद १३१ (नोरा डिसोझा ११, श्रीश्तिका शिवारकर ६, जोया मीर ७०, युवल ०, आर्या परब नाबाद २४, विदिका सावंत नाबाद ०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com