Goa Womens T20 Cricket: गोव्याच्या महिला संघाची धाकड कामगिरी; गुजरातला नमवत जिंकला टी-20 चा किताब

Reliance G-1 Senior Womens T20 Cricket: अहमदाबाद येथे झालेल्या रिलायन्स जी-१ सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांनी विजेतेपद पटकावले.
Goa Womens T20 Cricket
Goa Womens T20 CricketDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket News: अहमदाबाद येथे झालेल्या रिलायन्स जी-१ सीनियर महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांनी विजेतेपद पटकावले. मोसमपूर्व स्पर्धेत मिळवलेले जेतेपद गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालय मैदानावर बुधवारी अंतिम सामना झाला.

त्यावेळी गोव्याच्या महिलांनी यजमान गुजरात संघाला ४४ धावांनी हरविले. सामन्यात गोव्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातला निर्धारित २० षटकांत ९ बाद ७७ धावांत रोखले.

अंतिम लढतीत गुजरातने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोव्याच्या डावात तरन्नुम पठाण हिने सर्वाधिक ३१ धावा केल्या. तिने ३३ चेंडूंतील खेळीत तीन चौकार व एक षटकार मारला. त्याखालोखाल संजुला नाईक हिने २२, तर शिखा पांडे हिने १८ धावांचे योगदान दिले.

डावाच्या अखेरीस पूर्वा भाईडकर हिने केलेल्या १४ धावाही निर्णयाक ठरल्या गुजरातला ७७ धावात रोखताना तरन्नुम पठाण, प्रीती यादव व श्रेया परब यांची गोलंदाजी निर्णायक ठरली. प्रीती व श्रेया यांनी प्रत्येकी तीन, तर तरन्नुम हिने दोन गडी बात केले. गुजराततर्फे भावना गोपलानी हिने सर्वाधिक २५ धावा केल्या.

Goa Womens T20 Cricket
Goa Women Cricket: गोव्याच्या मुलींचा संघ 23 धावांत आऊट; तामिळनाडूने सहज पार केले आव्हान

गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या या स्पर्धेत यजमान गुजरात, गोवा, सौराष्ट्र व बडोदा या संघांचा समावेश होता. चारही संघ तुल्यबळ असल्याने गोव्याच्या विजेतेपदाचे महत्त्व वाढले आहे. गतमोसमात गोव्याने छत्तीसगडमधील स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. स्पर्धेत गोव्याने प्रशिक्षक सर्वेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळविले.

Goa Womens T20 Cricket
Goa Women Cricket: गोव्याच्या मुलींचा संघ 23 धावांत आऊट; तामिळनाडूने सहज पार केले आव्हान

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ९ बाद १२१ (संजुला नाईक २२, श्रेया परब ६, पूर्वजा वेर्लेकर १२, तरन्नुम पठाण ३१, शिखा पांडे १८, तेजस्विनी दुर्गड १, प्रीती यादव ०, पूर्वा भाईडकर १४, विनवी गुरव नाबाद ९, सुनंदा येत्रेकर ३, हिरल सोळंकी ४-२४, रेणुका चौधरी २-१९) वि. वि. गुजरात ः २० षटकांत ९ बाद ७७ (भावना गोपलानी २५, हिरल सोळंकी ११, शिखा पांडे ४-०-१८-०, मिताली गवंडर १-०-८-०, तरन्नुम पठाण ३-०-३-२, प्रीती यादव ४-१-८-३, श्रेया परब ४-१-१२-३, सुनंदा येत्रेकर ४-०-२७-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com