Goa Cricket Association: क्रिकेटला मिळणार नवे बळ: GCAचा चिखली-वास्को येथील मैदान वापरासाठी राज्य सरकारसोबत करार

GCA Ground Agreement Vasco: गोवा क्रिकेट असोसिएशनने पुढील नऊ वर्षांसाठी चिखली-वास्को येथील गोवा क्रीडा प्राधिकरण मालकीच्या मैदान वापरासंबंधी राज्य सरकारशी सांमजस्य करार केला.
Goa Cricket Association
Goa Cricket AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विविध पातळीवरील क्रिकेट सामने घेताना मैदानाची कमतरता भासू नये या उद्देशाने गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) व्याप्ती वाढविली असून आता त्यांनी पुढील नऊ वर्षांसाठी चिखली-वास्को येथील गोवा क्रीडा प्राधिकरण मालकीच्या मैदान वापरासंबंधी राज्य सरकारशी सांमजस्य करार केला.

या करारामुळे मुरगाव तालुका आणि परिसरातील क्रिकेट गुणवत्तेला खतपाणी घालणे, तसेच दर्जेदार क्रिकेट सुविधा उपलब्ध करणे ‘जीसीए’ शक्य होईल, असे या करारावर सही केल्यानंतर जीसीए सचिव शंभा नाईक देसाई यांनी सांगितले.

सामंजस्य कराराच्या वेळेस जीसीए सचिव शंभा, संयुक्त सचिव रुपेश नाईक, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक अरविंद खुटकर, साहाय्यक संचालक (प्रशिक्षण) अर्विन कोर्दो यांची उपस्थिती होती.

Goa Cricket Association
Bhandari Samaj Goa: ...तसे न केल्यास देवानंद नाईकांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार, गावकर यांचा इशारा

या सामंजस्य कराराबद्दल मुरगाव तालुक्यातील क्रिकेट क्लबनी जीसीए माजी अध्यक्ष चेतन देसाई, सध्याचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव शंभा नाईक देसाई, बीसीसीआय संयुक्त सचिव रोहन गावस देसाई, जीसीए खजिनदार दया पागी, संयुक्त सचिव रुपेश नाईक, सदस्य राजेश पाटणेकर यांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com