GCA: 'जीसीए' निवडणुकीसाठी संलग्न 4 क्लब टांगणीवर! 107 क्लबची यादी अंतिम; उमेदवारी अर्ज स्वीकारायला सुरुवात

Goa Cricket Association Election: गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) निवडणूक अधिकारी ए. के. जोती सोमवारी संघटनेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण १०७ मतदार क्लबची यादी अंतिम केली.
Goa Cricket Association Election
Goa Cricket Association ElectionCanva
Published on
Updated on

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) निवडणूक अधिकारी ए. के. जोती सोमवारी संघटनेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण १०७ मतदार क्लबची यादी अंतिम केली, पण त्यापैकी चार क्लब टांगणीवर असून त्यांच्या मतदार अधिकाराबाबत भवितव्य लवकरच ठरेल. ‘‘नियम १०(९) अंतर्गत अधिनियमाच्या अनुषंगाने कार्यवाही पत्रव्यवहारात असून लवकरच निर्णय घेण्यात येईल,’’ असे नमूद करण्यात आले आहे.

आर्लेम स्पोर्टस क्लब, चौगुले स्पोर्टस क्लब, ला पाझ गार्डन क्रिकेट क्लब, साळगावकर क्रिकेट क्लब या चार क्लब मतदारांबाबत निवडणूक अधिकाऱ्याने निर्णय घेतलेला नाही. जीसीएच्या अधिनियमातील नियम १०(९) अंतर्गत नमूद करण्यात आले आहे, की

“सदस्य क्लबचा अध्यक्ष हा निवडणुकीत मतदान करेल. परंतु, कोणत्याहीकारणास्तव जर सदस्य क्लबचा अध्यक्ष वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून मतदान करू शकत नसेल, तर तो सदस्य क्लबच्या सचिवास मतदानासाठी अधिकृत करू शकतो.”

जीसीए निवडणूक मसुदा मतदार यादीनुसार मतदार या नात्याने आर्लेम क्लब व चौगुले क्लबतर्फे विजय चौगुले यांचे, तर ला पाझ गार्डन व साळगावकर क्लबतर्फे डी. व्ही. साळगावकर यांचे नाव आहे.

निवडणूक अधिकाऱ्याने नमूद केले आहे, की ‘‘हे स्पष्ट करण्यात येते की, सदस्य क्लबचा अध्यक्ष अशा “अधिकृतता पत्रे” संबंधित सचिवांना देऊ शकतो. तथापि, सदस्य क्लब अध्यक्षांनी अशी “अधिकृतता पत्रे” ऑनलाईन किंवा पत्राद्वारे “निवडणूक अधिकारी”

यांच्याकडे ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. योग्य पडताळणीनंतर मतदार यादीत आवश्यक बदल करण्यात येतील.’’

मतदार यादीतील संलग्न क्लबतर्फे मतदार एकदाच मतदान करून शकेल असा आदेश निवडणूक अधिकाऱ्याने हरकतीसंदर्भात दिलेला आहे. निवडणूक मतदार यादीसंदर्भात एकूण सात हरकती सदस्यांकडून दाखल करण्यात आल्या होत्या.

Goa Cricket Association Election
GCA: गोवा क्रिकेट संघटनेत पुन्हा 2 गट, निवडणूक होणार 16 सप्टेंबर रोजी; समितीतील मतभेद गाजण्याचे संकेत

आजपासून उमेदवारी अर्ज

जीसीए व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, खजिनदार हे पाच पदाधिकारी व एका सदस्यपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) व बुधवारी (ता. ३) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील.

Goa Cricket Association Election
Goa Cricket Stadium:गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार का नाही? 7 वर्षापासून GCA ची चालढकल; जमीन काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

निवडणुकीत ‘प्रतिथयश’ मतदार

येत्या १६ सप्टेंबर रोजी नियोजित असलेल्या जीसीए निवडणुकीसाठी संलग्न क्लब मतदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसार राज्यातील प्रतिथयश व्यक्ती मतदार आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत (स्पार्कलिंग स्टार्स असोसिएशन), मत्स्योद्योग खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर (साकुरा क्रिकेट क्लब), माजी सभापती राजेश पाटणेकर (डिचोली क्रिकेट क्लब), माजी आमदार प्रताप गावस (विविधा स्पोर्टस क्लब), उद्योगपती श्रीनिवास धेंपे (धेंपो क्रिकेट क्लब), विजय चौगुले, डी. व्ही. साळगावकर, दिलीप साळगावकर (जीनो स्पोर्टस क्लब), झेवियर मार्किस (गोवा स्पोर्टस अकादमी), मनोज काकुले (पणजी जिमखाना) आदींचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com