Tennis Ball Cricket: टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोव्याचा 'डबल धमाका', अखिल भारतीय आंतरविभागीय ज्युनियर स्पर्धेत मुला-मुलींची बाजी

Goa Wins Junior Tennis Ball Cricket: हिमाचल प्रदेशमधील नाग्रोटा बागवान येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविभागीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याने ‘डबल धमाका’ साधताना मुला-मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
Tennis Ball Cricket
Tennis Ball CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हिमाचल प्रदेशमधील नाग्रोटा बागवान येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविभागीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याने ‘डबल धमाका’ साधताना मुला-मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. स्पर्धा हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने भारतीय टेनिस बॉल क्रिकेट महासंघाच्या सहकार्याने घेतली होती.

गोव्याच्या मुलांनी अंतिम लढतीत दिल्लीला एकही गडी न गमावता हरविले. या लढतीत साईश नाईक सामन्याचा मानकरी ठरला. त्यापूर्वी उपांत्य लढतीत त्यांनी महाराष्ट्रावर ११ धावांनी मात केली होती.

मुलींच्या अंतिम लढतीत गोव्याने महाराष्ट्राला सात विकेट राखून हरविले. या लढतीत संध्या राय हिने सामन्याची मानकरी पुरस्कार पटकावला.

Tennis Ball Cricket
Goa Taxi Drivers Protest: कॅब ॲग्रिगेटरला तीव्र विरोध! वाहतूक खात्यात टॅक्सी चालकांची झुंबड; बाबूश म्‍हणतात, रेंट अ कार, बाईक बंद करा; टॅक्‍सीवाले येतील नफ्‍यात

संक्षिप्त धावफलक: मुलगे अंतिम लढत: दिल्ली : ५.४ षटकांत सर्वबाद २८ (शौनक नाईक ३-५, चिन्मय केरेकर १-८, सनम कळंगुटकर १-१०, शौर्य गावडे २-५) पराभूत वि. गोवा :२.२ षटकांत बिनबाद ३३ (साईश नाईक नाबाद २४), सामनावीर: साईश नाईक.

मुली अंतिम सामना: महाराष्ट्र : ५.१ षटकांत सर्वबाद २४ (संध्या राय ३-५, प्रतीक्षा केरकर २-६, पूर्वा गावडे १-८, अंतरा नाईक १-०) पराभूत वि. गोवा: २ षटकांत १ बाद २५, सामन्याची मानकरी: संध्या राय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com