Ranji Trophy 2026: 40 पैकी 38 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या; गोव्याच्या फलंदाजांची रणजीत दयनीय अवस्था

Goa batting collapse against Uttar Pradesh in Ranji Trophy 2026: गोव्याने दोन सामन्यांतील चार डावांत मिळून ४० विकेट्स गमावल्या आहेत. त्यापैकी ३८ विकेट्स फिरकी गोलंदाजांनी मिळविल्या आहेत.
Goa Batting Performance
Ranji TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एलिट अ गटात गोव्याला बडोदा व उत्तर प्रदेशविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले आणि आता पुढील लढतीत आणखी एक बलाढ्य संघ विदर्भाचे खडतर आव्हान असेल. मागील दोन लढतीतील चार डावांत त्यांना द्विशतकी धावसंख्या गाठण्यात अपयश आले असून फिरकी गोलंदाजी खेळणे अडचणीचे ठरले आहे.

गोव्याने दोन सामन्यांतील चार डावांत मिळून ४० विकेट्स गमावल्या आहेत. त्यापैकी ३८ विकेट्स फिरकी गोलंदाजांनी मिळविल्या आहेत. यावरून गोव्याच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळणे कठीण ठरत असल्याचा निष्कर्ष काढता येतो. बडोदा संघाविरुद्ध पणजी जिमखान्यावर ऑफस्पिनर महेश पिठिया व डावखुरा फिरकी भार्गव भट यांनी दोन्ही डावांत मिळून एकत्रित १८ गडी बाद केले, दोन विकेट्स वेगवान गोलंदाजांना मिळाल्या.

Goa Batting Performance
Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

उत्तर प्रदेशविरुद्ध डावखुरा कार्तिक यादव, लेगस्पिनर झीशान अन्सारी, ऑफस्पिनर वंश चौधरी व करण शर्मा या फिरकी गोलंदाजांनी दोन्ही डावातील मिळून सर्व २० गडी एकत्रित बाद केले. त्यात झीशान याने पहिल्या, तर १९ वर्षीय कार्तिक याने दुसऱ्या डावात पाच गडी बाद केले.

१९९ सर्वोच्च धावसंख्या

दोन रणजी सामन्यांतील चार डावांत गोव्याला अजून द्विशतकी धावसंख्या गाठता आलेली नाही. बडोदाविरुद्ध गोव्याने पहिल्या डावात १९९ धावा केल्या, फॉलोऑननंतर त्यांचा दुसरा डाव १३८ धावांत गारद झाला. उत्तर प्रदेशविरुद्ध गोव्याला अनुक्रमे १६४ व १६७ धावाच करता आल्या. यावरून गोव्याची फलंदाजी सध्या कमजोर बनली असून खूपच चिंताजनक आहे. लागोपाठच्या दोन पराभवांना फलंदाज जास्त कारणीभूत ठरले आहेत.

Goa Batting Performance
Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com