
पणजी: धेंपो क्रिकेट क्लबने दुसऱ्याच दिवशी संपलेल्या सामन्यात गुरुवारी पणजी जिमखान्याला ७३ धावांनी हरविले, तरीही गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना चौगुले स्पोर्टस क्लब व एमसीसी यांच्यातील सामन्याच्या निकालासाठी प्रतीक्षा करावी लागली आहे.
पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर धेंपो क्लबने २२२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतर पणजी जिमखान्याचा दुसरा डाव १४८ धावांत आटोपला. सामन्यांत दोन दिवसांत मिळून ४० गडी बाद झाले. विजयामुळे आता धेंपो क्लबचे पाच लढतीतून १६ गुण झाले आहेत. पणजी जिमखान्याने अगोदरच १९ गुणांसह अंतिम फेरी गाठली आहे.
चौगुले स्पोर्टस क्लब व एमसीसी यांच्यातील तीन दिवसीय सामना मडगाव क्रिकेट क्लबच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर सुरू आहे. या लढतीत चौगुले क्लबने पहिल्या डावात ९६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर एमसीसी संघाची ५ बाद १०९ अशी स्थिती होती. ते फक्त १३ धावांनी पुढे आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला तरीही चौगुले क्लबला अंतिम फेरी प्रवेश मिळेल. विजय नोंदविल्यास ते सहज आगेकूच राखतील. सध्या त्यांचे १५ गुण आहेत. चौगुले क्लबसाठी अपेक्षित निकाल लागल्यास धेंपो क्लबचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येईल.
- धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः १६४ व दुसरा डाव ः ६५.१ षटकांत सर्वबाद २०८ (सार्थक भिके २८, समर दुभाषी ६८, मनीष काकोडे २७, तनय त्यागराजन ५-५७, पुलकित नारंग ४-८१) वि. वि. पणजी जिमखाना ः १५१ व दुसरा डाव ः ४५ षटकांत सर्वबाद १४८ (राजशेखर हरिकांत नाबाद ७९, सागर उदेशी ४-४२, निनाद राठवा ५-४७).
- एमसीसी, पहिला डाव १७० व दुसरा डाव ः ३३ षटकांत ५ बाद १०९ (ईशान गडेकर २०, अभिनव तेज राणा ४४, पियुष यादव २१, दर्शन मिसाळ ४-४५) विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः ८२.१ षटकांत सर्वबाद २६६ (क्षितिज पटेल ७८, शिवेंद्र भुजबळ ५४, फाबिद अहमद ४-८२, विकास सिंग ४-६२).
- साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव ः १२८.१ षटकांत ९ बाद ५४७ घोषित (सनथ नेवगी १०९, स्नेहल कवठणकर १३६, नितीन तन्वर ६४, यश कसवणकर ७९, अभिनव ४२, शुभम देसाई २-१०७, सिद्धेश वीर ५-१०२) विरुद्ध जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव ः ४३ षटकांत ५ बाद १४१ (शुभम रोहिल्ला नाबाद ५७, अर्जुन २-३५, नितीन तन्वर २-३५).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.