Manish Jadhav
लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये (LDR) प्रेम आणि उत्साह टिकवून ठेवणे थोडे आव्हानात्मक असले, तरी अशक्य नक्कीच नाही.
दिवसभरात काय घडले, तुम्ही काय खाल्ले इथपासून ते ऑफिसमधील गप्पांपर्यंत सर्व काही एकमेकांना सांगा. यामुळे तुम्ही एकमेकांच्या आयुष्याचा भाग आहात, असे सतत जाणवत राहील.
दूर असूनही तुम्ही एकत्र चित्रपट पाहू शकता किंवा एकाच वेळी रात्रीचे जेवण करु शकता. व्हिडिओ कॉलवर 'कॅंडल लाईट डिनर'चा अनुभव घेणे तुमच्या नात्यात नवा उत्साह भरेल.
केवळ मेसेजवर अवलंबून न राहता व्हिडिओ कॉल्सचा (Video Calls) आधार घ्या. एकमेकांचा चेहरा पाहून बोलल्याने अंतराची जाणीव कमी होते आणि भावनिक जवळीक वाढते.
वेळोवेळी जोडीदाराला अनपेक्षितपणे फुले, त्यांचे आवडते खाद्यपदार्थ किंवा एखादे छोटे भेटवस्तू कुरियरने पाठवा. हे छोटेसे सरप्राईज तुमच्या प्रेमाची आठवण करुन देईल.
लॉन्ग डिस्टन्समध्ये संशयाला जागा देऊ नका. एकमेकांच्या वेळेचा आणि प्रायव्हसीचा आदर करा. पारदर्शकता आणि विश्वास हेच या नात्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत.
पुढच्या वेळी तुम्ही कधी भेटणार आहात, याचे नियोजन आधीच करुन ठेवा. भेटीची ओढ आणि त्या दिवसाची काउंटडाउन (Countdown) केल्यामुळे नात्यात सकारात्मकता टिकून राहते.
रोज बोलणे महत्त्वाचे आहे, पण जोडीदाराला स्पेस देणेही तितकेच गरजेचे आहे. संवाद प्रेमाने असावा, ओझं वाटणारा नको. तुमची 'गुड मॉर्निंग' आणि 'गुड नाईट' ही तुमच्या प्रेमाची हजेरी असेल.