Indian Super League: घरच्या मैदानावर विजयाचे लक्ष्य! गौरमांगी सिंग यांच्या नेतृत्वाखाली एफसी गोवा चेन्नईयीनविरुद्ध भिडणार

FC Goa vs Chennaiyin FC: एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गौरमांगी सिंग यंदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करत आहेत.
FC Goa vs Chennaiyin FC
Indian Super LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: एफसी गोवाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गौरमांगी सिंग यंदा इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करत आहेत. घरच्या मैदानावरील पहिल्या लढतीत त्यांनी शनिवारी (ता. १०) विजयी लक्ष्य बाळगले आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध सामना होईल.

एफसी गोवा संघात यंदा नवे खेळाडू दाखल झाले आहेत, तरीही संघाची खेळण्याची विशिष्ट शैली आणि ओळख यांच्यात अजिबात बदल होणार नाही, असे गौरमांगी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, “एफसी गोवाची एक स्पष्ट ओळख आहे. आम्हाला नेहमीच प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज द्यायची आहे आणि संपूर्ण मोसमात सातत्याने स्पर्धात्मक खेळ करायचा आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही.

FC Goa vs Chennaiyin FC
Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

आमच्या क्लबची स्वतःची एक ओळख आहे. चेंडूवर प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक नियंत्रण राखणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सामना जिंकण्याची सर्वोत्तम संधी आम्हाला मिळू शकते.” २०२२ ते २०२५-२६ पर्यंत एफसी गोवाचे साहाय्यक प्रशिक्षकपद भूषविल्यानंतर गौरमांगी मुख्य प्रशिक्षकपदी बढती मिळाली.

सामूहिक प्रयत्न : झिंगन

संघाचा कर्णधार, अनुभवी बचावपटू संदेश झिंगन याने संघाच्या यशासाठी सामूहिक प्रयत्न आणि मुख्य प्रशिक्षकांनी आखून दिलेल्या रणनीतीचे महत्त्व अधोरेखित केले. संघातील प्रत्येक खेळाडूने एकत्रितपणे काम करणे आणि ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार खेळणे आवश्यक असल्याचे त्याने नमूद केले. तो यंदा एफसी गोवातर्फे सलग चौथा आयएसएल मोसम खेळत आहे.

पूर्वी सहकारी, आता प्रतिस्पर्धी

४० वर्षीय गौरमांगी भारतातर्फे २००६ ते २०१३ या कालावधीत बचावफळीत आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळले, तर ४४ वर्षीय गोमंतकीय क्लिफर्ड मिरांडा २००५ ते २०१४ या कालावधीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये भारताचे प्रमुख मध्यरक्षक होते. त्या कालावधीत गौरमांगी व क्लिफर्ड सहकारी होते, आता शनिवारी दोघेही प्रतिस्पर्धी प्रशिक्षक या नात्याने मैदानावर आव्हान उभे करणार आहेत.

FC Goa vs Chennaiyin FC
Arz NGO Goa: महिला-मुलींच्या संरक्षणासाठी गोवा सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 'अर्ज' संस्थेला कल्याणकारी संस्थेचा दर्जा

याविषयी गौरमांगी यांनी सांगितले, की ‘‘आम्ही चांगले मित्र आहोत. दीर्घकाळ मैदानावर सहकारी होतो, गोव्यातही खेळलो. एकेमकांना चांगले ओळखतो. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. प्रशिक्षक म्हणून आमचा दृष्टिकोन आता वेगळा आणि स्पर्धात्मक आहे. त्याच दृष्टीने मैदानात उतरू. चेन्नईयीन एफसीविरुद्धचा सामना निश्चितच आमच्यासाठी आव्हानात्मक आणि खडतर असेल.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com