'FC Goa'चा भारतीय प्रशिक्षकावर विश्वास, गौरमांगी सिंग यांना पदोन्नती; 2026-27 मधील फुटबॉल मोसमासाठी संघाची बांधणी

FC Goa Head Coach: स्पॅनिश मानोलो मार्केझ यांनी तीन मोसमानंतर जूनमध्ये मुख्य प्रशिक्षकपद त्यागल्यानंतर आगामी मोसमासाठी रिक्त जागी भारतीय प्रशिक्षकाच्या पूर्णवेळ नियुक्तीस एफसी गोवा संघाने प्राधान्य दिले.
FC Goa Head Coach
FC Goa Head CoachDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्पॅनिश मानोलो मार्केझ यांनी तीन मोसमानंतर जूनमध्ये मुख्य प्रशिक्षकपद त्यागल्यानंतर आगामी मोसमासाठी रिक्त जागी भारतीय प्रशिक्षकाच्या पूर्णवेळ नियुक्तीस एफसी गोवा संघाने प्राधान्य दिले. मार्केझ यांचे साहाय्यक असलेले भारताचे माजी आंतरराष्ट्रीय गौरमांगी सिंग मोईरांगथेम यांना पदोन्नती निश्चित झाली आहे.

एफसी गोवा संघ २०२६-२७ मोसमात गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरेल. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदा एफसी गोवाच्या सपोर्ट स्टाफमध्येही सारे भारतीयच असतील. एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ लढतीत एफसी गोवा १२ ऑगस्ट रोजी तुर्कमेनिस्तानात एफके अर्कादाग संघाविरुद्ध खेळेल

FC Goa Head Coach
Goa Dubai Flights: युद्धविरामानंतर मोठा निर्णय! बंद पडलेली गोवा–दुबई विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू; एअर इंडिया एक्सप्रेसची घोषणा

इंफाळ-मणिपूर येथील चाळीस वर्षीय गौरमांगी यापूर्वी एफसी गोवा संघात साहाय्यक प्रशिक्षक होते. २०२५-२६ मधील आयएसएल मोसमात मार्केझ एका सामन्यात निलंबित होते, तेव्हा ९ मे २०२६ रोजी फातोर्डा येथे एफसी गोवा संघ आयएसएल स्पर्धेत मोहन बागानविरुद्ध गौरमांगी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला, तेव्हा सामना १-१ बरोबरीत राहिला होता.

FC Goa Head Coach
Goa Politics: गोव्यात नव्या प्रादेशिक पक्षाची चर्चा; राजकीय गती की विरोधकांची अधोगती?

मानोलो यांनीही गौरमांगी यांच्या प्रशिक्षण कामगिरीची दखल घेऊन मागे त्यांचे कौतुक केले होते. मार्केझ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांच्या अनुपस्थितीत गौरमांगी यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने २०२४ मध्ये भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल गोल्ड ट्रॉफी जिंकली होती.

गौरमांगी क्लब पातळीवर सर्वाधिक काळ (२००७-२०१२) गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघातर्फे खेळले. भारतातर्फे ते २००६ ते २०१३ या कालावधीत ७२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. गौरमांगी यांनी सहा आंतरराष्ट्रीय गोलही केले आहेत. ते बंगळूर युनायटेडचे प्रशिक्षक होते, २०२२ मध्ये ते एफसी गोवा संघात साहाय्यक प्रशिक्षक बनले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com