Durand Cup 2026: 'ड्युरँड कप' फुटबॉल स्पर्धा 25 जुलैपासून; अंतिम सामना 23 ऑगस्टला, 'या' पाच शहरांत रंगणार सामने

Durand Cup 2026: आशियातील सर्वांत जुनी १३५ वी ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धा येत्या २५ जुलैपासून खेळली जाणार असून अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी होईल.
Durand Cup 2026
Durand Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आशियातील सर्वांत जुनी १३५ वी ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धा येत्या २५ जुलैपासून खेळली जाणार असून अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी होईल. सामने कोलकता, रांची, गुवाहाटी, इंफाळ, शिलाँग येथे होतील. झारखंडमधील रांचीला यंदा प्रथमच यजमान शहराचा मान मिळाला आहे.

ड्युरँड कप ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सक्रिय फुटबॉल स्पर्धा आहे. सामने कोलकता येथे विवेकानंद युवा भारती क्रीडांगण व किशोर भारती क्रीडांगणावर, रांची येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर, गुवाहाटी येथील इंदिरा गांधी ॲथलेटिक स्टेडियमवर, इंफाळमधील खुमान लाम्पाक स्टेडियमवर, तसेच शिलाँग येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळले जातील.

Durand Cup 2026
ISL Football: FC Goaच्या खात्यात पूर्ण तीन गुण! मोरेनो, द्राझिचचे गोल; मोहम्मेडन स्पोर्टिंगला नमविले

ड्युरँड कप स्पर्धा भारतीय लष्कराच्या पूर्व विभागातर्फे घेण्यात येत आहे. स्पर्धेतील सहभागी संघांची संख्या १६ वरून २४ संघापर्यंत वाढविण्यात आली आहे. स्पर्धेत दोन परदेशी संघांचाही समावेश असेल. स्पर्धेतील सहभागी संघ, गटवारी, वेळापत्रकाची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. स्पर्धेत गतवर्षी गुवाहाटी येथील इंडियन सुपर लीग (आयएसएल) संघ नॉर्थईस्ट युनायटेडने विजेतेपद पटकावले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com