ISL Football: FC Goaच्या खात्यात पूर्ण तीन गुण! मोरेनो, द्राझिचचे गोल; मोहम्मेडन स्पोर्टिंगला नमविले

Fc Goa Vs Mohammedan Club: सामन्याच्या पूर्वार्धातील ३२ मिनिटांत दोन गोल नोंदवून एफसी गोवाने यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुण प्राप्त केले.
Fc Goa Vs Mohammedan Club
Fc Goa Vs Mohammedan ClubDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धातील ३२ मिनिटांत दोन गोल नोंदवून एफसी गोवाने यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पूर्ण तीन गुण प्राप्त केले. कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर त्यांनी मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबवर २-० असा चमकदार विजय प्राप्त केला.

मागील लढतीत इंटर काशीविरुद्ध १-१ गोलबरोबरीवर समाधान मानलेल्या एफसी गोवाचे आता शुक्रवारच्या विजयामुळे दोन लढतीतून चार गुण झाले आहेत. मोहम्मेडन स्पोर्टिंगला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. अगोदरच्या लढतीत त्यांना जमशेदपूर एफसीने १-० असे हरविले होते. एफसी गोवाचा पुढील सामना २६ फेब्रुवारी रोजी फातोर्डा येथे स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्ध होईल.

सामन्याच्या चौथ्याच मिनिटास एफसी गोवास आघाडी मिळाली. द्राझिच याच्या भेदक कॉर्नर किकवर स्पॅनिश बचावपटू मोरेनो याने उंच उडी घेत अफलातून हेडिंग साधले. नंतर ३२व्या मिनिटास एफसी गोवाची आघाडी वाढली.

Fc Goa Vs Mohammedan Club
आघाडीपटू नेमिल याच्या खांद्यावर आक्रमणाची धुरा, FC GOAचे प्रशिक्षक मार्केझ नवोदितावर खूश

मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या गोलरक्षकाने एफसी गोवाच्या उदांता सिंग याला गोलक्षेत्रात पाडले. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर द्राझिच याने अचूक नेम साधला. ७२व्या मिनिटास माहितोश रॉय याचा फटका एफसी गोवाचा गोलरक्षक ऋतिक तिवारी याने अडविला, मात्र रिबाऊंडवर अगदी जवळून माकन विंकल चोथे याचा फटका गोलपट्टीवरून बाहेर गेल्यामुळे यजमान संघाला पिछाडी कमी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे एफसी गोवास स्पर्धेत ‘क्लीन शीट’ राखणे शक्य झाले.

Fc Goa Vs Mohammedan Club
AFC League 2025: वर्षातील अखेरचा सामना खेळणार FC Goa! सकारात्मक समारोपासाठी इच्छुक; ‘इस्तिक्लोल’चे आव्हान

दृष्टिक्षेपात...

देयान द्राझिच याचे आता २ सामन्यांतून २ गोल

पोल मोरेनो याचा एफसी गोवातर्फे पहिलाच आयएसएल गोल

एफसी गोवाचा मोहम्मेडन स्पोर्टिंगवर सलग दुसरा विजय

गतवेळी ४ मार्च २०२५ रोजी फातोर्डा येथे २-० फरकाने विजयी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com