Cooch Behar Trophy: गोव्याची पराभवाची मालिका संपेना! स्पर्धेत सलग चौथ्यांदा हाराकिरी, खात्यात अवघा एक गुण

Cooch Behar U19 Cricket Trophy 2024: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याला रविवारी सकाळी दारुण पराभवास सामोरे जावे लागले. पंजाबने त्यांच्यावर डाव व २५८ धावांनी दणदणीत विजय संपादन केला.
Cricket News
Cricket NewsX
Published on
Updated on

Cooch Behar U19 Cricket Trophy 2024 Goa Vs Punjab

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याला रविवारी सकाळी दारुण पराभवास सामोरे जावे लागले. पंजाबने त्यांच्यावर डाव व २५८ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर यजमान संघाला स्पर्धेच्या एलिट ‘क’ गटात सलग चौथी हार स्वीकारावी लागली.

गोव्याने पहिल्या डावात ११० धावा केल्यानंतर पंजाबने ५ बाद ४७० धावांवर डाव घोषित करून ३६० धावांची आघाडी घेतली होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरच्या ५ बाद ७४ धावांवरुन गोव्याचा दुसरा डाव रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी पाऊण तासातच गारद १०२ धावांत गारद झाला.

Cricket News
Goa Politics: चर्चेशिवाय काही बोलल्यास 'ती' त्याची वैयक्तिक भूमिका! पाटकरांचे स्पष्टीकरण; ‘इंडिया’ आघाडी टिकण्यासाठी चोडणकरांचा पुढाकार

कर्णधार यश कसवणकर याने सर्वाधिक ३३ धावा केल्या. याशिवाय पुंडलिक नाईकने ११ धावा केल्या. द्रिश नार्वेकर (०), अनुज यादव (६), ग्रंथिक बुयाव (०) जास्त काळ टिकले नाही. द्विज पालयेकर शून्यावर नाबाद राहिला. पंजाबच्या दमनप्रीत सिंग व शुभम राणा यांनी प्रत्येकी तीन, तर अनमोलजीत सिंग याने दोन गडी बाद केले.

Cricket News
Tiger Attack: ..अचानक समोर आला वाघ! हल्ला करणार इतक्यात; चोर्ला घाटातील थरारक प्रसंग वाचा

फक्त एक गुण

गोव्याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्धच्या अनिर्णित लढतीतून एका गुणाची कमाई केली. नंतर तमिळनाडूकडून डाव व १०४ धावांनी, हरियानाविरुद्ध पाच विकेटने, छत्तीसगडविरुद्ध २६० धावांनी, तर पंजाबविरुद्ध डाव व २५८ धावांनी पराभव पत्करला. गोव्यातर्फे पाच सामन्यांत मिळून १९ खेळाडू स्पर्धेत खेळले. फक्त एका गुणासह गोव्याने एलिट विभागीय स्थान राखले. कारण अन्य गटात हिमाचल प्रदेश, मेघालय व नागालँड या संघांना पाचही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यापैकी दोन संघांची प्लेट गटात रवानगी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com