Cooch Behar Trophy 2025: गोव्याची शानदार विजयी हॅट्‌ट्रिक, उत्तर प्रदेशला सात विकेटने हरविले; पण बोनस गुण हुकला

Cooch Behar Trophy: गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने मोसमातील स्पृहणीय कामगिरी कायम राखताना बुधवारी कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात उत्तर प्रदेशला सात विकेट राखून हरविले.
Cooch Behar Trophy 2025
Cooch Behar Trophy 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने मोसमातील स्पृहणीय कामगिरी कायम राखताना बुधवारी कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात उत्तर प्रदेशला सात विकेट राखून हरविले, पण ४४ धावांचे लक्ष्य गाठताना तीन विकेटचे मोल दिल्यामुळे यजमान संघाला बोनस गुणास मुकावे लागले. त्यांनी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

तिसऱ्या दिवशी संपलेला एलिट ड गट सामना कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर झाला. पहिल्या डावातील १६४ धावांच्या आघाडीनंतर गोव्याने उत्तर प्रदेशचा दुसरा डाव २०७ धावांत गुंडाळला, त्यामुळे पाहुण्या संघापाशी ४३ धावांची आघाडी जमा झाली. गोव्याने सामना १० विकेटने जिंकला असता, तर त्यांना सात गुण मिळाले असते, पण १० षटकांत तीन विकेट गमावल्यामुळे सामन्यात सहा गुणांवर समाधान मानावे लागले.

Cooch Behar Trophy 2025
Goa Politics: भाजप शिस्तीला आव्हान! संजना वेळीप काँग्रेसमध्ये; आजगावकर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत

अगोदरच्या दोन सामन्यांत अनुक्रमे छत्तीसगड व आसामविरुद्ध डावाने विजय मिळविल्यामुळे गोव्याला बोनस गुण मिळाला होता. आता तीन लढतीतून गोव्याचे २० गुण झाले असून गटात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. अगोदरचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर सांगे येथे पराभूत झालेल्या उत्तर प्रदेशचे तीन लढतीनंतर १३ गुण कायम राहिले. गोव्याचा पुढील सामना ८ डिसेंबरपासून बंगालविरुद्ध कल्याणी येथे खेळला जाईल.

उत्तर प्रदेशने दुसऱ्या दिवसअखेरच्या ३ बाद ५४ वरून बुधवारी सकाळी टिच्चून फलंदाजी केली. कर्णधार भावी गोयल (६१) व कैफ रेहमान (५६) यांनी अर्धशतके नोंदविताना चौथ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केल्यामुळे उत्तर प्रदेशला सावरता आले, मात्र नंतर त्यांची ८ बाद १६३ अशी घसरगुंडी उडाली. कठीण परिस्थितीत आठव्या क्रमांकावरील आदित्यकुमार सिंग (नाबाद ४२) याने अखेरच्या दोन विकेटसह ४४ धावांची भर टाकल्यामुळे गोव्याला पुन्हा फलंदाजीस उतरावे लागले.

Cooch Behar Trophy 2025
Goa Winter Tourism: हिवाळ्यात खरा आनंद घ्यायचाय? गोव्यातील 'हे' ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठिकाण

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश, पहिला डाव ः १२५

गोवा, पहिला डाव ः २८९

उत्तर प्रदेश, दुसरा डाव (३ बाद ५४ वरुन) ः ८६.१ षटकांत सर्वबाद २०७ (भावी गोयल ६१, कैफ रेहमान ५६, आदित्यकुमार सिंग नाबाद ४२, समर्थ राणे १६-६-२७-२, चिगुरुपती व्यंकट १०-१-२६-२, यश कसवणकर २५.१-५-६९-१, मिहीर कुडाळकर १७-५-४०-३, शिवेन बोरकर १७-२-३८-१, पियुष देविदास १-०-४-०)

गोवा, दुसरा डाव ः १० षटकांत ३ बाद ४४ (आदित्य कोटा २२, शंतनू नेवगी ०, सार्थक भिके ०, यश कसवणकर नाबाद १५, दिशांक मिस्कीन नाबाद २, यश पनवर १-३, कार्तिकेय १-१६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com