CK Nayudu Trophy: आर्यन नार्वेकर, दिशांक मिस्कीन अन् जीवनकुमारची दमदार फलंदाजी, बिहारविरुद्ध गोव्याची द्विशतकी मजल

col ck nayudu trophy u23 cricket goa vs bihar: अर्धशतके नोंदविलेले कर्णधार आर्यन नार्वेकर व दिशांक मिस्कीन, तसेच जीवनकुमार चित्तेम याच्या दमदार फलंदाजीमुळे गोव्याने बिहारविरुद्धच्या २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात द्विशतकी मजल मारली.
col ck nayudu trophy u23 cricket goa vs bihar
CK Nayudu TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: अर्धशतके नोंदविलेले कर्णधार आर्यन नार्वेकर व दिशांक मिस्कीन, तसेच जीवनकुमार चित्तेम याच्या दमदार फलंदाजीमुळे गोव्याने बिहारविरुद्धच्या २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात द्विशतकी मजल मारली. चार दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा गोव्याने पाच गडी गमावून २१७ धावा केल्या होत्या. बिहारमधील राजगीर येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एलिट क गटातील चार दिवसीय सामन्याला सोमवारपासून सुरवात झाली.

गोव्याने (Goa) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण सुरवातीचे तीन गडी ४० धावांत गमावल्यामुळे त्यांचा डाव संकटात सापडला. आर्यनने स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक नोंदविताना दिशांक याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. वैयक्तिक ६० धावांवर आर्यन पायचीत बाद झाला. त्याने १३८ चेंडूंचा सामना करताना चार चौकार व दोन षटकार मारले.

col ck nayudu trophy u23 cricket goa vs bihar
WPL Auction 2026: गोव्याच्या पूर्वजा वेर्लेकरची डब्ल्यूपीएल लिलावात धडक; महिला प्रीमियर लीगच्या लिलाव यादीत मिळवले स्थान!

दिशांकने नंतर जीवन याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. अर्धशतकाला सात धावा हव्या असताना जीवन बाद झाला. त्याने ७६ चेंडूंतील खेळीत चार चौकारांसह ४३ धावा केल्या. दिवसअखेर दिशांक ६२ धावांवर खेळत होता. त्याने २०७ चेंडूंना सामोरे जाताना सहा चौकार लगावले.

col ck nayudu trophy u23 cricket goa vs bihar
WPL Final 2026 : वडोदऱ्यात रंगणार आरसीबी अन् दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फायनलचा थरार; कधी होणार टॉस अन् कुठे पाहता येणार फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग?

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ८९ षटकांत ५ बाद २१७ (देवनकुमार चित्तेम १, अमन धूपर १८, शंतनू नेवगी २०, आर्यन नार्वेकर ६०, दिशांक मिस्कीन नाबाद ६२, जीवनकुमार चित्तेम ४३, अनुज यादव नाबाद ७, राहुल कुमार २-४२, सुधांशू कुमार २-३२, उत्कर्ष कुमार १-३५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com