C K Nayudu Trophy: 120 धावांत 7 विकेट कोसळल्या! गोव्याचा सलग तिसरा पराभव; केरळचा 243 धावांनी शानदार विजय

Goa Vs Kerala: सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ६३ धावा केलेल्या गोव्याचा दुसरा डाव सोमवारी सकाळच्या सत्रातच अवघ्या १२० धावांत गुंडाळला गेला.
Goa Vs Kerala
Goa Vs KeralaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाचे फलंदाजीतील रडगाणे कायम राहिल्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत त्यांना सोमवारी सलग तिसऱ्या, तर एकंदरीत चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले. तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चार दिवसीय लढतीत केरळने २४३ धावांनी शानदार विजय प्राप्त करत बाद फेरी गाठण्याची शक्यताही कायम राखली.

एलिट अ गट सामन्यात गोव्यासमोर दुसऱ्या डावात ३६४ धावांचे लक्ष्य होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ६३ धावा केलेल्या गोव्याचा दुसरा डाव सोमवारी सकाळच्या सत्रातच अवघ्या १२० धावांत गुंडाळला गेला. यासह केरळने स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांच्या कैलास नायर याने फक्त २१ धावा देत ५ गडी टिपले.

या सामन्यातून केरळला एकूण १२ गुण मिळाले. यामध्ये फलंदाजीतील दोन, गोलंदाजीतील चार, तर विजयाच्या सहा गुणांचा समावेश आहे. त्यांचे आता सहा लढतीतून एकूण ४७ गुण झाले असून गटात त्यांना चौथा क्रमांक मिळाला आहे. गोव्याला पाच गुणांवर समाधान मानावे लागले.

यामध्ये फलंदाजीतील एका, तर गोलंदाजीतील चार गुणांचा समावेश आहे. ते आता एकूण २६ गुणांसह आठ संघांच्या गटात सातव्या स्थानी आहेत. गोव्याचा गटसाखळीतील अखेरचा सामना १३ फेब्रुवारीपासून जम्मू येथे जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळला जाईल.

Goa Vs Kerala
C K Nayudu Trophy: गोव्याचा दारुण पराभव! पंजाबचा एक डाव, 296 धावांनी विजय; फलंदाजांची दुसऱ्या डावातही शरणागती

संक्षिप्त धावफलक

केरळ, पहिला डाव ः २५५

गोवा, पहिला डाव ः १७१

केरळ, दुसरा डाव ः २७९

Goa Vs Kerala
CK Nayudu Trophy: 92 धावांत ऑलआउट! गोव्याच्या युवकांचे पंजाबसमोर सपशेल लोटांगण; यजमान संघावर फॉलोऑनची नामुष्की

गोवा, दुसरा डाव (३ बाद ६३ वरुन) ः ४७.३ षटकांत सर्वबाद १२० (शंतनू नेवगी २५, समर्थ राणे ३, दिशांक मिस्कीन ७, मिहीर गावडे १, अनुज यादव १३, चिगुरुपती व्यंकट ९, नित्यय कुंकळीकर नाबाद १२, कौस्तुभ पिंगुळकर ०, जे. एस. अनुराज २-२९, कैलास नायर १४.३-७-२१-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com