C K Nayudu Trophy: शिवेंद्र - लखमेशची शतकी भागीदारी! तरीही गोवा मोठ्या धावसंख्येपासून वंचित

C K Nayudu Trophy 2024: यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने शैलीदार शतक नोंदविताना अर्धशतक केलेल्या लखमेश पावणे याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरच्या सहा विकेट २५ धावांत गमावल्यामुळे गोव्याला छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही.

Goa Cricket Team | C K Nayudu Trophy U 23Dainik Gomantak
Published on
Updated on

C K Nayudu Trophy 2024 Goa vs Chhattisgarh

पणजी: यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने शैलीदार शतक नोंदविताना अर्धशतक केलेल्या लखमेश पावणे याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरच्या सहा विकेट २५ धावांत गमावल्यामुळे गोव्याला छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही.

कर्नल सी.के. नायडू करंडक २३ वर्षांखालील ब गट क्रिकेट सामन्यात सोमवारी गोव्याचा पहिला डाव ४ बाद २४३ वरून २६८ धावांत संपुष्टात आला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर गोव्याचा डाव गडगडला. नंतर पावसामुळे खेळ थांबला, तेव्हा छत्तीसगडने पहिल्या डावात २ बाद ३९ धावा केल्या. सांगे येथील जीसीए मैदानावर पावसाचे पाणी साचल्यामुळे दिवसभराचा खेळ पुढे सुरू होऊ शकला नाही.

C K Nayudu Trophy 2024:  यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने शैलीदार शतक नोंदविताना अर्धशतक केलेल्या लखमेश पावणे याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. मात्र, अखेरच्या सहा विकेट २५ धावांत गमावल्यामुळे गोव्याला छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचणे शक्य झाले नाही.
C K Naidu Trophy: गोव्याच्या युवा संघाची उडाली दाणादाण; नायडू करंडक स्पर्धेत रेल्वेचा शानदार विजय

शिवेंद्र याने १०० धावा केल्या. त्याने १४७ चेंडूंतील खेळीत १० चौकार व पाच षटकार मारले. चमकदार ५१ धावा करून लखमेश याने त्याला चांगली साथ दिली. लखमेशने १०५ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ५१ धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com