C K Nayudu Trophy: वर्चस्वानंतर गोव्याने सूत्रे गमावली; उत्तर प्रदेशच्या 4 बाद 315 धावा

C K Nayudu U23 Cricket Trophy 2024: नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी टाकताना गोव्याने कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात उत्तर प्रदेशला कोंडीत पकडले, पण नंतर वर्चस्व निसटल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३१५ धावांची मजल मारली.
C K Nayudu Trophy
CricketCanva
Published on
Updated on

C K Nayudu U23 Cricket Trophy 2024 Goa vs Uttar Pradesh

पणजी: नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी टाकताना गोव्याने कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात उत्तर प्रदेशला कोंडीत पकडले, पण नंतर वर्चस्व निसटल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३१५ धावांची मजल मारली.

कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर शुक्रवारपासून चार दिवसीय सामन्याला सुरवात झाली. लखमेश पावणे व शिवम प्रताप सिंग यांनी २५व्या षटकात उत्तर प्रदेशची ४ बाद ७३ अशी स्थिती केली होती.

नंतर कर्णधार आराध्य यादव व शोएब सिद्दिकी यांनी पाचव्या विकेटसाठी २४२ धावांची अभेद्य भागीदारी करून यजमान संघाला दिवसअखेर सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. आराध्य १५८ धावांवर नाबाद असून त्याने २४१ चेंडूंचा सामना करताना १८ चौकार मारले. शोएब ९८ धावांवर खेळत आहे. आक्रमक शैलीत त्याने १३५ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांची नोंद केली.

C K Nayudu Trophy
Goa Crime: चोर्ला घाटात सापडला मद्यसाठा! वाळपई पोलिसांची कारवाई; 24 हजारांची दारु जप्त

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश, पहिला डाव ः ७८ षटकांत ४ बाद ३१५ (मानव सिंधू १२, आदर्श सिंग १३, आराध्य यादव नाबाद १५८, सिद्धार्थ यादव २१, शोएब सिद्दिकी नाबाद ९८, लखमेश पावणे १८-१-६३-२, शिवम प्रताप सिंग १७-२-५०-२, शदाब खान १५-२-५५-०, सनिकेत पालकर ९-०-३६-०, दीप कसवणकर ११-०-७२-०, आर्यन नार्वेकर ३-०-२१-०, अझान थोटा ५-०-१५-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com