Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर गोव्याकडूनच खेळणार! संघ सोडण्याच्या चर्चांवर पडदा; क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी अपडेट

Arjun Tendulkar Continue Playing For Goa: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडूनच खेळणार आहे.
Arjun Tendulkar Continue Playing For Goa
Arjun TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket Association Arjun Tendulkar Update: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडूनच खेळणार आहे. त्याच्या भविष्याबाबत सुरु असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला. आयपीएल 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग असलेल्या अर्जुनने गोव्याच्या ओमान दौऱ्यातून माघार घेतली होती, ज्यामुळे तो संघ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन गोव्याच्या संघातच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

2022-23 च्या देशांतर्गत हंगामापूर्वी अर्जुन मुंबई सोडून गोव्याच्या (Goa) संघात सामील झाला होता. तेव्हापासून तो या संघाचा एक मुख्य आणि महत्त्वाचा गोलंदाज आहे. गोव्याकडून खेळताना त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत. केवळ गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही त्याने मोलाचे योगदान दिले असून रणजी ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्ध शानदार शतक झळकावत त्याने अष्टपैलू क्षमता सिद्ध केली.

Arjun Tendulkar Continue Playing For Goa
Arjun Tendulkar: 4 सामन्यांत 0 विकेट! अर्जुन तेंडुलकरमुळे वाढले गोव्याचे टेन्शन; महागडी गोलंदाजी ठरतेय डोकेदुखी

दुसरीकडे, नुकत्याच संपलेल्या आयपीएल हंगामात अर्जुन लखनऊ सुपर जायंट्सकडून शेवटचा सामना खेळला होता. पंजाब किंग्जविरुद्धच्या या सामन्यात त्याने 4 षटकांत 36 धावा देऊन 1 बळी घेतला होता. त्याच्या या कामगिरीनंतर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहून अर्जुनचे कौतुकही केले होते. संपूर्ण हंगामात संधी मिळण्यासाठी संयम राखणे, शांतपणे मेहनत करणे आणि सकारात्मक राहणे यासाठी सचिनने मुलाचे कौतुक केले होते. तेंडुलकर आडनावामुळे अर्जुन नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिला असला, तरी कठीण परिस्थितीत त्याने मैदानावर दाखवलेल्या संयमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com