Aaroshi Govekar: .. ऐसी धाकड है! गोव्याच्या 'आरोशी'ची भारतीय फुटबॉल संघात निवड; नेपाळविरुद्ध पदार्पणाची संधी

Aaroshi Govekar Football : गोव्याची महिला फुटबॉलपटू आरोशी गोवेकर हिची भारताच्या सीनियर महिला फुटबॉल संघात निवड झाली असून तिला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी आहे.
Aaroshi Govekar Goa Football
Aaroshi Govekar Goa Football Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याची महिला फुटबॉलपटू आरोशी गोवेकर हिची भारताच्या सीनियर महिला फुटबॉल संघात निवड झाली असून तिला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी आहे.

बार्देशमधील नेरुल येथील आरोशी सेझा फुटबॉल अकादमीचेही प्रतिनिधित्व करते. सिक्कीमची राजधानी गंगटोक येथील पालझोर स्टेडियमवर भारत व नेपाळ यांच्यात महिला मैत्रिपूर्ण आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना बुधवारी (ता.२९) खेळला जाईल. सिक्कीम राज्य निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा सामना होत आहे.

नेरुलमध्ये मुलांसमवेत फुटबॉल खेळत आरोशीच्या कारकिर्दीस सुरवात झाली. महिलांच्या क्लब पातळीवरील फुटबॉल स्पर्धांत ती यापूर्वी बंगळूर एफसी, कळंगुट असोसिएशन, पुणेरी वॉरियर्स या संघांतून खेळलेली आहे. भारतीय संघात निवड होण्याबाबत आरोशी म्हणाली, की, ‘भारतीय संघाची जर्सी परिधान करणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न आहे.

Aaroshi Govekar Goa Football
New Coach of Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाला 13 वर्षांनंतर मिळाला 'Indian Coach', 'या' माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

हा क्षण माझ्यासाठी वैयक्तिक सर्वोत्तम असून अनेक वर्षांची समर्पित, परिश्रमी आणि जिद्दी कामगिरीचे फळ आहे. सेझा अकादमी, सहकारी, तसेच कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळेच मी येथपर्यंत पोहचले आहे. भारत व गोव्यासाठी अभिमानास्पद ठरण्यासाठी मी सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील राहीन.’

Aaroshi Govekar Goa Football
I League Football: धेंपो क्लबच्या ‘सुपर सब’ची कमाल! दिल्ली एफसीविरोधात नोंदवला शानदार विजय; नेस्टरचा गोल ठरला निर्णायक

सर्वोत्तम बचावपटूचा किताब

आरोशी गोवेकर हिने राज्यपातळीवरील महिला फुटबॉलमध्ये लक्षवेधक खेळ केलेला आहे. २०१८ पासून ती राज्यस्तरीय महिला लीग स्पर्धेत खेळत आहे.

२०२४ व २०२५ मध्ये तिने महिलांच्या सीनियर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले. सेझा फुटबॉल अकादमी संघातून खेळताना तिने २०२४-२५ मध्ये महिला लीग करंडक पटकावला. या स्पर्धेत ती सर्वोत्तम बचावपटू ठरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Women Cricket Team Enters Asian Games Final
BCCI Refuses Trophy From Mohsin Naqvi
India vs Pakistan women’s Asia cup 2026
FC Goa new signings latest updates
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com