Harvalem Multani Soil Mine : गोव्यासाठी गुड न्युज! हरवळेच्या खाणीत सापडली आयुर्वेदीक ‘मुलतानी माती'

आयुर्वेदिक गुणतत्त्व : आरोग्यासाठी उपयुक्त; रॉयल्टी आणि जीएसटीही वाढणार
GOA FINDS NEW MINOR MINERAL
GOA FINDS NEW MINOR MINERALDainik Gomantak
Published on
Updated on

Multani Soil Mine Found In harvalem : त्वचेवरील उपायांसाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुलतानी माती (कॅल्शियम बेंटोनाईट) या नवीन गौण खनिजाचा शोध हरवळे येथील खाणींमध्ये लागला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात मेसर्स नथुरमल इको मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडला लीज डीड सुपूर्द केली.

या खनिजाला मुलतानी माती किंवा फुलर्स अर्थ असेही म्हणतात. आयुर्वेदिक औषध तयार करणे, प्रामुख्याने चेहऱ्याला आणि त्वचेला तजेलदार बनवणे, खाद्यतेल, वाईन बनवणे, आरोग्य आणि निरोगीपणा, बांधकाम, कचरा व्यवस्थापन, शेती, पशुखाद्य इत्यादींमध्ये या खनिजाचा उपयोग केला जातो.

GOA FINDS NEW MINOR MINERAL
LLB Admission Scam : ‘एलएलबी’ प्रवेशासाठी नव्याने मेरिट लिस्ट बनवा; विद्यापीठाची सूचना

मुलतानी मातीत मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. तसेच अ‍ॅल्युमिनियम सिलिकेटही आढळून येतात. शोषण क्षमता जास्त असते. त्यामुळे त्वचा फ्रेश आणि चमकदार राहण्यास मदत होते. ही माती तेलकट त्वचा आणि मुरुमांच्या समस्येवर खूप फायदेशीर आहे.

यातील चुना तत्त्व हानीकारक बॅक्टेरिया, अतिरिक्त तेल आणि धूळ-माती हटवण्यास मदत करते. चेहऱ्यावर जास्त फोड, मुरुम झाल्यामुळे होणारी जळजळ रोखण्यास मुलतानी माती खूप फायदेशीर आहे.

सैल पडलेली त्वचा घट्ट करण्यासही ती मदत करते. या मातीचा नियमित वापर केल्याने सुरकुत्या आणि त्वचेतील सैलपणा दूर होण्यास मदत मिळते.

‘डोलोमाईट’चेही उत्पादन

सरकारने मार्च 2022 मध्ये ‘डोलोमाईट’ नावाच्या खनिजाबाबत मेसर्स नथुरमल इको मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत भाडेतत्त्वाचा करार केला आहे. या खनिजाचा शोध आणि उत्पादनासाठी सध्या ही कंपनी कार्यरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com