Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

Sangameshwar Chalukya Dynasty History: भारताच्या दक्षिणेत मध्ययुगीन काळातील इतिहासात कधीही लुप्त न होणारी सत्ता म्हणजे चालुक्यांचे गौरवशाली घराणे .
Sangameshwar Chalukya Dynasty History
Sangameshwar Chalukya DynastyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सर्वेश बोरकर

शेलार कुळाच्या सत्तेच्या पतनामुळे निर्माण झालेल्या पोकळीनंतर, प्रमुख महाराजा वज्रपालदेवराय (वांगोजीराजे) शिर्के प्रथम यांच्या नेतृत्वा खाली राजेशिर्के या कुळाचा संगमेश्वरमध्ये झपाट्याने विस्तार झाला.

भारताच्या दक्षिणेत मध्ययुगीन काळातील इतिहासात कधीही लुप्त न होणारी सत्ता म्हणजे चालुक्यांचे गौरवशाली घराणे. पहिल्या संगमेश्वर चालुक्य महाराजांचे राजकवी शेष यांनी रचलेल्या संस्कृत संगमेश्वर महात्म्यामध्ये कर्णदेवांच्या जीवनप्रवासाचे सविस्तर वर्णन असून, त्यांना पौराणिक देवतांच्या पंक्तीत स्थान दिले गेले आहे. राजकवी शेष म्हणतात महान सृष्टिकर्ताच्या हातून चालुक निर्माण झाला.असे म्हटले जाते की, त्यांचा वंशज चालुक्य कर्णदेवाने महाराष्ट्रातील कोल्हापूर मंदिराच्या बांधकामासाठी डोंगराएवढी संपत्ती खर्च केली, जे मंदिर ‘श्री यंत्राच्या’ धर्तीवर बांधले गेले होते तसेच.

Sangameshwar Chalukya Dynasty History
Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

महाराजा कर्णदेवांना कलियुगाचा दुसरा कर्ण मानले जात असे आणि त्यांना मिळालेला आश्रय अभूतपूर्व होता, इतका की चालुक्य वंशाला कर्णवंश म्हणूनही ओळखतो त्यांच्या नंतर वेतुगिदेव गादीवर आले व त्यानंतर सोमेश्वर पंचम, ज्यांच्या नंतर त्यांचे धाकटे बंधू सोमदेव (सोमेश्वर सहावे) गादीवर आले. मंगळवेध कलचुरी कुळातील बिज्जल द्वितीय याने कल्याणी सिंहासन बळकावल्या नंतर कल्याणी चालुक्य घराण्याने आपली राजधानी आजच्या धारवाड जिल्ह्यातील अन्निगेरी येथे व नंतर बनवासी येथे हलवली आणि अखेरीस जाधवरावांच्या अधिपत्याखाली महामंडलेश्वर म्हणून संगमेश्वरमध्ये स्थायिक झाले.

शेलार कुळाच्या सत्तेच्या पतनामुळे निर्माण झालेल्या पोकळीनंतर, प्रमुख महाराजा वज्रपालदेवराय (वांगोजीराजे) शिर्के प्रथम यांच्या नेतृत्वाखाली राजेशिर्के या कुळाचा संगमेश्वरमध्ये झपाट्याने विस्तार झाला. त्यांनी तळ कोकण प्रदेशातील ८४ गावे जिंकून पूर्ण केली व त्यानंतर तो प्रदेश शिरकन टप्पा म्हणून ओळखला जाऊ लागला. राजेशिर्के यांना पुण्यापलीकडील घाट माथ्यापासून सुरू होऊन वारणा नदीपर्यंत पसरलेला आणि पुढे कल्याणपुराधीश्वर संगमेश्वर चालुक्य प्रदेशात विलीन होणारा भूभाग वाटून घ्यावा लागला, आणि त्यामुळे या दोन मराठा राजांनी आपापसात सतत वैर असूनही तणावपूर्ण एकोप्याने राज्य केले.

बहामनी मलिक-उत-तुज्जरच्या नेतृत्वा खालील कोकणवरील पहिले आक्रमण एकत्र मोडून काढल्याने त्यांचे नाते अधिक घट्ट झाले, आणि पुढील बहमनी मलिक-उत-तुज्जर वजीर महमूद गवानच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या आक्रमणाचा सामनाही त्यांनी एकजुटीने केला, ज्यात शत्रूविरुद्ध ५० हून अधिक गनिमी लढाया लढत एक रक्तरंजित संघर्ष घडला. घोरपडे कुळाने खेलना यशस्वीपणे सर केल्यामुळे चालुक्यांचा अखेर पराभव झाला आणि या मोहिमेनंतर त्यांना नायकांचा दर्जा मिळाला. त्यांच्या बहुतेक मांडलिक राज्यांचे किल्ले बहामनी राज्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले किंवा त्यांना शाही बहामनी सिंहासनाशी निष्ठा ठेवण्यास भाग पाडले. परंतु चालुकांनी किनारपट्टीवरील हल्ले करण्याची आपली पारंपरिक प्रथा चालूच ठेवली होती. चालुक्य राजा, जरी त्यांचा प्रदेश केवळ ७-८ गावांपुरता आणि जमवलेल्या ६०० माणसांच्या सैन्यापुरता मर्यादित झाला होता, तरीही ते एक बलाढ्य देशभक्त घराणे होते.

जेव्हा बलाढ्य पोर्तुगीज आक्रमक अल्फोन्सो डी अल्बर्कर्कने कोकणावर हल्ला चढवला, तेव्हा संगमेश्वर चालुक्य राजा बालोजीराव, जे प्रभावळीचे प्रसिद्ध राजे होते, त्यांनी आक्रमकांच्या या नवीन लाटेला निकराचा विरोध केला. त्याने सर्व शंका बाजूला सारून, काबायोचे स्थानिक बहामनी गव्हर्नर रसूल खान आणि खारेपाटणचे मलिक रुस्तम यांच्याशी तात्काळ युती केली आणि गोवा मुक्त करण्यासाठी मदत करण्याकरिता बहामनी मजलिस-उल-रफी युसूफ आदिल खान यांच्याकडे राजदूत पाठवले. या काळात बहामनी साम्राज्य विखुरले होते आणि बहामनी सेनापती युसूफ आदिल खान सुलतान बनला होता. राजा बलोजीराव यांनी २,००० सैनिकांसह पुढाकार घेऊन बांदाच्या दिशेने कूच करत मोर्चेबांधणी केली.

Sangameshwar Chalukya Dynasty History
Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

पुढे खूप वर्षानंतर इ.स. १५८४ मध्ये, संगमेश्वर चालुक्यांनी पोर्तुगीजांवर हल्ला केला, जे कोचीनच्या हिंदू राज्यात तळ ठोकणार होते. पोर्तुगीज व्हाईसरॉय डुआर्ट डी मेन्झेस यांनी कोचीनचे हिंदू राज्य ताब्यात घेण्यासाठी आपले नौदल सेनापती डोम जाइल्स यानेझ मास्करेन्हास यांना पाठवले होते. वाटेत, डोम जाइल्सला १४ जहाजे आणि ३०० कमांडोंच्या ताफ्यासह मराठा चालुक्यांचा जयगड किल्ला उद्ध्वस्त करण्याचे आदेशही होते, जो हिंदू नौदलाचा तळ होता. तिथे पोहोचल्यावर, डोम शास्त्री नदीमार्गे अंतर्देशीय प्रवास करण्यासाठी आपल्या गॅलियनमधून एका बोटीवर उतरला.

डोम जाइल्सची बोट खडकाळ उथळ प्रदेशात शिरून अडकताच, मराठे अचानक जंगलातून बाहेर आले आणि त्यांनी चारी बाजूंनी त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारले, तर गॅलियनवरील बाकीचे सर्व पोर्तुगीज सैन्य हताशपणे पाहत राहिले आणि मग पळून गेले.अशाप्रकारे मराठ्यांनी कोचीनला वाचवले! पण आता मराठा साम्राज्याला उद्ध्वस्त करण्यावरच सर्व प्रयत्न केंद्रित झाले होते. आपल्या नुकसानीचा बदला घेण्यासाठी पोर्तुगीजांनी संधीसाधूपणे आदिलशाही सैन्याशी हातमिळवणी केली.

Sangameshwar Chalukya Dynasty History
Goa Politics: गोव्यात महाआघाडीचे समीकरण जुळणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सहभागाची शक्यता

मराठा राजा मर्यादित संसाधने असूनही इतका शक्तिशाली होता, की पोर्तुगीज आणि आदिलशाही साम्राज्यांना त्याच्याविरुद्ध १५८३ आणि १५८४ मध्ये अनेक संयुक्त आणि अयशस्वी मोहिमा कराव्या लागल्या. चालुक्य राजांना दडपण्यासाठी स्थापनेपासूनचे सर्वात तीव्र वैर बाजूला ठेवण्यात आले. इ.स. १५८४-८५ मध्ये मराठ्यां विरुद्धच्या संयुक्त सूड मोहिमेत जमिनीवरून आदिलशाही गव्हर्नर रोस्ती खानच्या नेतृत्वाखालील ४०,००० विजापूर पायदळ आणि डोम हिक्रोम डी मास्कारेन्हासच्या नेतृत्वाखालील १३ बोटींचा पोर्तुगीज नौदल ताफा यांचा समावेश होता. या दोन सैन्यांना वेगवान मराठा सैन्याला पकडता आले नाही, म्हणून त्याऐवजी त्यांनी समन्वय साधून स्थानिक हिंदू नागरिकांवर अमानुष अत्याचार आणि विध्वंस घडवून आणला, ज्यामुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला आणि परिणामी मराठा राजा धर्मोजीराजे यांना शांततेसाठी विनंती करावी लागली व पराभव स्वीकारावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com