
उत्तर गोव्यातील पर्रा नावाच्या एका छोट्याशा गावात, 'माडांनी' (म्हणजे नारळींमधून जाणारा) नावाचा एक रस्ता आहे. बॉलीवूडमधील एका चित्रपटातील दृश्यामुळे हा रस्ता प्रसिद्ध झाला. त्यानंतर हा रस्ता वाहनांसाठी कायम अडथळीचा बनला आहे कारण उभ्या भारतातील पर्यटक इन्स्टाग्राम रिल्स तयार करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी या जागेवर गर्दी करत आले आहेत.
आता तर त्या जागेवर पर्यटकांना सायकल भाड्याने देऊन कोणीतरी कमाई देखील सुरू केली आहे. 'माडानी' हे असे ठिकाण बनले आहे की ज्या ठिकाणी अनेक तथाकथित इन्फ्लुएन्सरनी आपले करिअर सुरू केले आहे.
गोवा आपल्या देशाचा एक सुंदर भाग आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण आपल्या देशात अशा प्रकारचे दशलक्ष ‘माडानी’ असू शकतात आणि ते कदाचित या जागांपेक्षाही सुंदर असू शकतात. अशा अनेक सुंदर जागांचे पुढे काय होत असते हे सर्वश्रुतच आहे.
‘माडानी’ आणि अशाच अनेक ठिकाणांचे भवितव्य वेगळे असणार नाही कारण अशा जाग्यांवर बिल्डरांची नजर सर्वात प्रथम जाते. गोव्यातील अशा अनेक जागांवर बिल्डरांची कुऱ्हाड कोसळली आहे आणि तेथील झाडांचा रक्तस्त्रावही सुरू झाला आहे. इन्फ्लुएन्सरने सर्वात प्रथम या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आणि गोवा विकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे.
गोवा हा विकण्यासाठी नाही तर अनुभव घेण्यासाठी आहे आणि तो अनुभव एखाद्या रस्त्याद्वारे नव्हे तर इथल्या लोकांद्वारे मिळत असतो. गोव्यातील लोक हे गोव्याच्या हृदयाचे ठोके आहेत आणि इथली झाडे, नद्या आणि डोंगर हे त्यांचे पेहराव आहेत.
ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते, 'इनफ्लुएन्सर हे सोशल मीडियावर वस्तूंचा किंवा सेवांचा प्रचार करून संभाव्य खरेदीदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेले लोक आहेत.' व्याख्या काही असो सत्य हे आहे की रस्त्यावर रील तयार करणे, सायकल चालवणे किंवा चित्रपटातील एखाद्या जागेला भेट देणे हा गंभीर व्यवसाय नाही कारण त्यातून गोव्याचे हृदय स्पष्ट होत नाही जर काही स्पष्ट होत असेल तर ती चित्रपट दिग्दर्शकाची सर्जनशीलता.
पर्यटन सुरू झाल्यापासून गोव्यातील स्थानिक लोकांनीच खऱ्या इन्फ्लुएन्सरची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही हेच वास्तव आहे. तथाकतीत इनफ्लुएन्सरना त्यांच्या कामासाठी पैसे मिळत असतात. गोव्याला भेट देण्यासाठी कोणी येईल की नाही याच्याशी कुठलाही संबंध नसलेला त्यांचा दृष्टिकोन असतो हे आपण लक्षात ठेवायला हवे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.