आपण नक्की कोण? गोमंतकीयांच्या आदिम मुळांचा आणि 'कुर' समुदायाचा रंजक शोध; मिथकांच्या आड दडलेला गोवा निर्मितीचा इतिहास

Kur Community Etymology: बहुतेक विद्वानांना असे वाटते की मूळ कुर हे मेंढीसाठी कुरी या कन्नड शब्दावरून आले आहे; तामिळमध्ये कोरी.
Origin of Goans
Origin of GoansDainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्रीगिश

गोव्यातील कुणबी आणि कर्नाटकातील लगतच्या भागातही ‘चावडी’ हा शब्द ज्या ठिकाणी समाजातील ज्येष्ठ, धुरीण विचारविमर्शासाठी भेटतात ती जागा, या अर्थाने वापरला जातो. बेल्लारी आणि म्हैसूरमधील कन्नड मच्छीमार आणि शेती करणाऱ्या कब्बेरा या समुदायामध्येदेखील हा शब्द त्याच अर्थाने वापरला जातो. (संदर्भ : थर्स्टन १९०९, कास्ट्स अँड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया, खंड ३)

तमिळनाडूच्या (Tamil Nadu) तंजावर, तिरुचिरापल्ली, करूर, अरियालूर, पेरांबलूर आणि मदुराई जिल्ह्यांतील ‘कल्लन’ समुदाय ही कुरुंबाची शाखा आहे असे मानण्यास वाव आहे, असे थर्स्टन म्हणतो. (संदर्भ : थर्स्टन १९०९, कास्ट्स अँड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया, खंड ३, पृष्ठ ८४) हा शब्द कन्नड, मराठी आणि तेलगू पशुपालकांनी व्यापलेल्या दख्खनच्या भूभागात समान अर्थाने वापरला जातो. तामिळनाडूमधील राजापालयमचे रझू आणि वायनाडचे जेनू कुरुंबादेखील गावातील सभेच्या ठिकाणासाठी हा शब्द वापरतात. (संदर्भ : थर्स्टन १९०९, कास्ट्स अँड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया, खंड ४, पृष्ठ १४२)

Origin of Goans
नोकरीचं आमिष, वासनेचा खेळ अन् 'ट्रक' घालून हत्येचा प्रयत्न! कुलदीप सेंगरच्या जामिनानं 'न्याय'व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह!- संपादकीय

असे समान अर्थाने वापरले गेलेले शब्द विखुरलेल्या समुदायांचे मूळ एक असावे या दिशेने निर्देश करतात. असा समुदाय अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. आमचा पुढील शोध सुलभ करण्यासाठी आम्ही त्याला ‘कुर’ समुदाय असे नाव देऊ शकतो का? ज्या इतर समुदायांना त्याचा सामना करावा लागला त्यांनी त्याला ‘कुर’ मूळ असलेले नाव दिले असावे. कुर काय असू शकते ? त्या मुळाची व्युत्पत्ती शोधावी लागेल.

बहुतेक विद्वानांना असे वाटते की मूळ कुर हे मेंढीसाठी कुरी या कन्नड शब्दावरून आले आहे; तामिळमध्ये कोरी. हे लोक शिकारीसाठी एकत्र येत येत स्थायिक जीवनाकडे वळत असताना, त्यांनी मेंढ्या आणि/किंवा शेळ्या पाळल्या असाव्यात. हा अजूनही या प्रदेशांत एक प्रमुख व्यवसाय आहे. या प्रदेशातील कोरडे हवामान त्याला कारणीभूत आहे. परंतु, कुर या शब्दाची दुसरी व्युत्पत्ती असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही.

Origin of Goans
कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

हे समान धागे कर्नाटक, गोवा (Goa), महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या प्रदेशांना ओवतात. काही प्रमाणात त्यांनी समकालीन राज्यांच्या सीमा ओलांडल्या असाव्यात किंवा त्यातील काही प्रदेश वगळले असतील; उदाहरणार्थ, आताचे काही भाग ओडिया (जसे गंजम जिल्हा) किंवा तामीळ (तंजावर किंवा मदुराई जिल्ह्यांसारखे) भाग असावा. ते स्वाभाविक आहे; कारण आपण अनेक शतकांपूर्वी किंवा हजारो वर्षांपूर्वी असलेला द्वीपकल्पाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि वांशिक भूगोल पाहत आहोत.

या टप्प्यावर, भारतीय उपमहाद्वीप आणि त्याच्या लगतच्या प्रदेशातील लोकांचे चित्र रेखाटणे योग्य ठरेल. भारतीय उपमहाद्वीप हा असा एक महत्त्वाचा भाग आहे जिथे आफ्रिकेतून शारीरिकदृष्ट्या आधुनिक मानवांचे आणि कदाचित त्यापूर्वी मानवपूर्व होमो प्रजातींचे स्थलांतरण झाले असावे. बाब अल मंडेब सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखातातून दक्षिणेकडील मार्गाने आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या मानवांना ईशान्य चौकातून सुदूर पूर्वेकडे आणि तेथून ऑस्ट्रेलियात जाऊन हे स्थलांतरित मिळाले.

यादरम्यान काही मानव वंश उत्तरेकडील मार्गाने सुपीक भूमीकडे वळला. काही मध्य आशियाई स्टेपेस्टो वायव्येकडे आणि ईशान्येकडील चीनमध्येही पसरले. पुढील ४०,००० ते ६०,००० वर्षांत या सर्व प्रदेशांमध्ये स्वतंत्र मानवी लोकसंख्या विकसित झाली. आणि नंतर ईसापूर्व ८००० आणि ईसापूर्व २०००च्या दरम्यान पुन्हा एकदा या प्रदेशांमध्ये आणि भारतीय उपखंडात, जवळच्या पूर्व, चीन आणि मध्य आशियाई स्टेप्समधून मोठे स्थलांतर झालेले दृष्टीस पडते. त्या क्रमाने भारतीय उपखंडाच्या थरामध्ये अनुवांशिक घुसखोरी झाली. या व्यापक कॅनव्हासवर आपल्याला भारतीय द्वीपकल्पातील लोकांना स्थान देण्याची गरज आहे.

Origin of Goans
अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

पूर्वीची द्रविड (तामिळ) बरोबर तुलना केली जाते. परंतु येथील मूळनिवासी कोण हे कोडे उलगडणे सर्वांत कठीण असल्याचे सिद्ध झाले आहे. आफ्रिकेतून बाहेर पडलेले लोकांचे प्रारंभिक वंशज जे पुढे संपूर्ण भारतीय उपखंडात पसरले व त्यांचे वंश पुढे विकसित झाले. वेदोडॉइड (ज्याला आपण वेद समुदाय म्हणतो), कुर समुदाय (कुरुबा, कुरुम्बा, कुंबी, कुणबी, कुर्मी, कुडुबी, कर्णी, कणबी, इ. आणि/किंवा ऑस्ट्रो-एशियाटिक) आणि द्रविड (ज्यांना आपण तामिळ म्हटले आहे). यांपैकी नक्की मूळचे निवासी कोण हे ठरवता येणे खरेच कठीण आहे.

गोमंतकीयांचे मूळ शोधण्याच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास इथे थांबत आहे. मूळ सापडले का? या प्रश्नाचे नेमके आणि नेटके उत्तर खरोखरच देता येणार नाही. पण, काही सूचक गोष्टींचा उल्लेख या प्रवासात केलेला आहे. त्यातून उत्तर काढणे हे सुज्ञ वाचकावर सोडले आहे. आपले उत्तरच बरोबर असा हट्टाग्रह करण्यात काहीच अर्थ नाही. अनेक कथा, मिथके आपण उलगडली. बाण मारून परशुरामाने समुद्र मागे हटवला, हे रूपक आहे. बाण मारून समुद्र मागे हटत नाही, त्यामुळे परशुरामच नव्हता, किंवा त्याने असे प्रयत्नच केले नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे.

Origin of Goans
'ईबी-5' व्हिसाची जागा घेणारे 'गोल्ड कार्ड': 'शुल्क भरा आणि नागरिकत्व मिळवा', अमेरिकेचा नवा मंत्र - संपादकीय

आज आपल्याला त्याने केलेले प्रयत्न ज्ञात नाहीत किंवा कळण्याचा कुठलाच मार्ग नाही, म्हणून तसे प्रयत्न झालेच नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. गोव्यातले मूळ निवासी कोण, नंतर आलेले कोण असा भेद करून भांडणे करण्यात काहीच अर्थ नाही. आता सगळे गोमंतकीयच आहेत. कालचक्रामध्ये आजवर गोमंतकीयांचा झालेला प्रवास महत्त्वाचा आहे. कुठून आले, यापेक्षाही त्यांनी इथली भूमी माणसांना राहण्यायोग्य बनवली हे महत्त्वाचे. त्यांच्यामुळेच आम्ही ‘गोंयकार’ आहोत!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com