Akbar Hajj History: बैराम खान सहस्रलिंग सरोवरावर पोचला, बंडखोर अफगाणांनी हल्ला केला; बादशाह अकबर व हज यात्रेकरू

Surat Port Hajj History: मुघल बादशाह अकबर हा हिंदुस्थानातील सर्वांत जास्त लोकप्रिय सम्राट. इतिहासकारांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, चारित्र्यावर, विजयांवर आणि धार्मिक सहिष्णुतेवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.
Mughal Emperor Akbar Hajj
Mughal Emperor Akbar HajjDainik Gomantak
Published on
Updated on

मुघल बादशाह अकबर हा हिंदुस्थानातील सर्वांत जास्त लोकप्रिय सम्राट. इतिहासकारांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, चारित्र्यावर, विजयांवर आणि धार्मिक सहिष्णुतेवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्याच्या दीन-ए-इलाही (दैवी श्रद्धा)लादेखील इतिहासाच्या पानांवर उच्च स्थान मिळाले आहे. बाराव्या आणि तेराव्या शतकात, भारतातून मक्केला हजसाठी ४ मार्ग होते. त्यापैकी एक गुजरातच्या प्रमुख बंदरांमधून अरबी समुद्राचा मार्ग होता.

प्राचीन काळात, पंधराव्या शतकापूर्वी, भारतीय हज यात्रेकरू गुजरातच्या भद्रेश्वर-कच्छ, खंभाट आणि भरूच बंदरांपासून आपला प्रवास सुरू करत. मध्ययुगात, पंधराव्या शतकानंतर, भारतीय हज यात्रेकरूंनी गुजरातच्या सुरत, भरूच, खंभाट आणि मांडवी-कच्छ बंदरांपासून आपला प्रवास सुरू केला.

सोळाव्या शतकातील गुजरात सुलतान मुझफ्फर दुसऱ्याने गरीब हज यात्रेकरूंना मोफत राहण्याची सुविधा देण्यासाठी जहाजे भाड्याने घेतली. सोळाव्या ते अठराव्या शतकात मुघल काळात, सुरत बंदर हज यात्रेकरूंसाठी मक्केचे प्रवेशद्वार होते.

मक्काई पूल आणि मुघल सराई येथील ऐतिहासिक इमारती आठवणी म्हणून अजूनही दिमाखात उभ्या आहेत. मक्केला जाण्यासाठी यात्रेकरू मक्काई पूल ओलांडून जात असत. ते ‘मुघल सराई’त राहत असत.

मुघल सम्राट अकबराचा ’खान-ए-खान’ सेनापती बैराम खान १५६१मध्ये, दिल्लीहून गुजरातची राजधानी पाटण येथे आला. तो आणि त्याचे कुटुंब मक्केच्या हज यात्रेला जात होते. बैराम खान हा अकबराचा नातेवाइक आणि त्याचा पालक, मुख्य मार्गदर्शक, सल्लागार, शिक्षक आणि सर्वांत विश्वासू सहकारी होता.

१५६१मध्ये, मुघल सरदार बैराम खान आणि त्याचे कुटुंब पाटणच्या सहस्रलिंग तलावात गेले होते. जेव्हा ते सरोवरावर पोहोचले तेव्हा त्याच्यावर ३० ते ४० बंडखोर अफगाणांनी हल्ला केला. बैराम खानला ठार मारण्यात आले आणि त्याचा शिरच्छेद करण्यात आला. त्याला पाटणमध्ये दफन करण्यात आले. नंतर, त्याचा मृतदेह माशाद (इराण) येथे नेण्यात आला.

या घटनेनंतर बादशाह अकबराने स्वतः हज यात्रेकरू व त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी बंदोबस्त करण्यास सुरुवात केली. मुघल बादशाह अकबराचे भारतातील हज यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेलं योगदान आतापर्यंत काहीसे दुर्लक्षित राहिले आहे.

त्याने राज्याच्या खर्चाने हजचे आयोजन केले आणि यात्रेकरूंना जाण्यासाठी सोय करून दिली. मक्का येथे भाविकांसाठी एक धर्मशाळा स्थापन केली गेली आणि दर हंगामात भारतातून एक ‘कारवां’ पाठवण्याचे आदेश दिले गेले.

त्याने मीर हज म्हणून एका वरिष्ठ सरदाराची नियुक्ती केली आणि आपल्या सर्वोच्च दरबारी अब्दुर रहीम खानाला जेद्दाह या बंदरातील यात्रेकरूंना मोफत वाहतुकीसाठी स्वतःची तीन जहाजे बाजूला ठेवण्याचे निर्देश दिले.

लाल समुद्रात यात्रेकरू जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी पोर्तुगिजांशी करार केल्यानंतर त्याने असे केले. या जहाजांचे वजन १४०० ते १६०० टन होते आणि प्रत्येकी १,७०० यात्रेकरू वाहून नेण्याची क्षमता होती.

गुजरातमध्ये मुघल सम्राट अकबराच्या राजवटीत हज यात्रेच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षी गुजरातहून एका मीर हाजी(हज अधिकारी)ला मक्का येथे नियुक्त करत असत. १५७६ मध्ये, अकबराच्या राजघराण्यातील वृद्ध बेगम, त्याची आई हमीदा बेगम आणि त्याची फुफी (काकू) गुलबदनबानू बेगम यांनी हज यात्रेची इच्छा व्यक्त केली.

अकबराने गुजरात अधिकाऱ्यांना शाही दलासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश दिले. बंडखोरी दडपण्यासाठी सुरतचे प्रशासक कालिजखान उत्तर गुजरातमधील इदार येथे होते. अकबराने त्यांना शाही महिलांच्या हज यात्रेच्या व्यवस्थेसाठी सुरतला परत जाण्याचे आदेश दिले. शाही दलासाठी ’सलीमा’ आणि इतरांसाठी ’इलाही’ ही दोन जहाजे हज अधिकारी सुलतानखान यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आली होती.

त्यावेळी पोर्तुगीज सत्तेचे महासागरावर राज्य होते आणि हिंदी महासागरात प्रवास करण्यासाठी भारतीय किनाऱ्यावरून निघणाऱ्या प्रत्येक जहाजाला दीव व दमन येथील पोर्तुगीज अधिकाऱ्यांकडून समुद्री प्रवासाची परवानगी घ्यावी लागत असे.

गुजराती उद्योगपती कल्याणदास यांचा पोर्तुगिजांशी व्यापार होता. त्यांनी त्यांच्या प्रभावाचा वापर करून पोर्तुगिजांकडून शाही दलासाठी प्रवासाची परवानगी मिळवली. एडेनजवळ चक्रीवादळाचा सामना केल्यानंतर, अकबराचे शाही दल तीन वर्षांनी हजवरून सुरतमार्गे आग्र्याला परतले.

सुरतमध्ये मुघल सराय (पाहुण्यांचे गृह) आता सुरत महानगरपालिकेची इमारत आहे. १५७६-१५८२पर्यंत अकबराच्या मीर हजमध्ये त्याच्यासोबत ६ लाख रुपयांहून अधिक रक्कम आणि मक्का आणि मदीना येथील लोकांमध्ये वाटण्यासाठी वस्तू होत्या. अकबराच्या सूचनेनुसार, त्याने हजारो खिलात (सन्मानाचे वस्त्र) आणि मक्केच्या शरीफसाठी महागड्या भेटवस्तूदेखील सोबत नेल्या.

Mughal Emperor Akbar Hajj
Konkan History: झाग्रोस पर्वतांच्या आसपासचे इराणी भारतीय उपखंडात आले! त्यांनी गहू, बार्ली, गुरेढोरे, मेंढ्या आणल्या; दख्खनमध्ये पोहोचले

अकबराच्या राजवटीपूर्वी कोणत्याही मुघल राजेशाही महिलेने हजची यात्रा केली नव्हती. अकबरने जेद्दाह बेगा बेगम किंवा हुमायूनच्या एका सरदाराची पत्नी हज्जी बेगम, जी नंतर हुमायूनची पत्नी बनली, ती सुरक्षित मार्गाने हज करणारी पहिली राजेशाही महिला ठरली. बादशहा बाबरची मुलगी आणि अकबरची काकू गुलबदन बेगम, बादशहाची स्वतःची पत्नी सलीमा बेगम आणि इतर ४० महिलांनीही अकबराच्या काळात हजची यात्रा केली.

त्या सलीमी जहाजावरून एका साहसी प्रवासानंतर १५७६मध्ये मक्का येथे पोहोचल्या. या राजेशाही महिला १५८२पर्यंत मक्केमध्ये राहिल्या आणि पवित्र शहरात राहताना चार वेळा हज आणि अनेक वेळा उमराह केली.

Mughal Emperor Akbar Hajj
Goa History: औरंगजेबाच्या मुलाने डिचोली परिसरातील मंदिरे उद्ध्वस्त केली; छत्रपती संभाजीराजांनी मुघलांना हाकलून देण्याची योजना आखली

मुघल बादशाह अकबराच्या आधी, भारतीय मुस्लिमांकडे हज यात्रेसाठी जमिनीवरून प्रवास करण्याचे किंवा जहाजांनी प्रवास करण्याचे दोनच पर्याय होते. जमिनीच्या मार्गाशी संबंधित विविध समस्यांमुळे, बहुतेक यात्रेकरू जहाजांना प्राधान्य देत असत.

परंतु पर्शियन आखात आणि लाल समुद्रात पोर्तुगीज चाच्यांची उपस्थिती खूप कठीण आणि धोकादायक होती. करार करून, अकबरने पोर्तुगिजांचा धोका दूर केला आणि मक्केचा प्रवास अतिशय सुरळीत आणि निष्कंटक केला. अकबराच्या पुढाकारामुळे भाविकांची संख्या वाढू लागल्याने, सुरत येथील प्रमुख नौकानयन बंदर मक्केचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाऊ लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com