Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

Goa Monsoon Wild Vegetables: तायकिळा, आकूर, अळू, तेरे, फागला, फोडशी, पिडूशी, कील्ल, कुड्की आणि गोव्यातली खास 'अळमी' म्हणजेच नैसर्गिकरीत्या उगवलेले मशरुम्स या काही भाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यातच उगवतात.
Goa Monsoon Wild Vegetables
Goa Monsoon Wild VegetablesDainik Gomantak
Published on
Updated on

पावसाने आपली किमया दाखवायला सुरुवात केली आहे. ही किमया आता रानभाज्यांच्या रूपाने आपल्या ताटापर्यंत नक्कीच पोहचणार. वर्षातील याच दिवसात वेगवेगळ्या रानभाज्या खायला मिळतात यातली प्रत्येक भाजी आपले वेगळेपण घेऊन येते. त्यामुळे या भाज्यांना एक वेगळेच महत्त्व आहे.

या भाज्यांची मूळ चव किंचितही कमी होऊ न देता, उगाचंच मसाल्याचा मारा न करता, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील काही भाज्या एक थेंब तेलाचा वापर न करता केल्या जातात आणि तरीही अतिशय चविष्ट लागतात हेच यांच वैशिष्ट्य. हा काळ मुद्दाम भाजी मंडईत चक्कर मारावी असाच असतो. एरवी भाजी मंडईचे रूप रंगीबेरंगी दिसते, पण या दिवसात हिरव्या रंगाने सजली आहे. भाजी मंडईत पावसाळी रानभाज्या दाखल झाल्यामुळे भाजी मंडईचे रूप पालटून गेलेय.

पावसाळा सुरू होताच केवळ पावसाळ्यात उगवणाऱ्या य रानभाज्या खाण्यासाठी घरातले अनेकजण आतुरलेले असतात. तायकिळा, आकूर, अळू, तेरे, फागला, फोडशी, पिडूशी, कील्ल, कुड्की आणि गोव्यातली खास 'अळमी' म्हणजेच नैसर्गिकरीत्या उगवलेले मशरुम्स या काही भाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यातच उगवतात. पाऊस सुरू होतो आणि खोल समुद्रात केली जाणारी मासेमारी दोन महिन्यांसाठी बंद होते, पण अनेकजण या काळात सात्विक आहार घेणं पसंत करतात. मासळीची कसर या पावसाळी भाज्या भरून

Goa Monsoon Wild Vegetables
Vegetable Farming in Goa: महाराष्ट्र, कर्नाटकावरील गोव्याचं अवलंबित्व कमी होणार, भाजीपाला लागवडीत वाढ; सासष्टी अग्रेसर!

काढत नसल्या तरी पुढे वर्षभर ताटात मासळी असतेच म्हणूनच कदाचित पाहुण्या बनून आलेल्या आणि थोडा काळ सोबत करणाऱ्या पावसाळी हिरव्यागार रानभाज्या ताटात आपली हक्काची जागा तयार करतात.

Goa Monsoon Wild Vegetables
Wild Vegetables: अळंबी खुडल्यानंतर, कळ्या राखून फांदीने झाकून टाकायची पद्धत; गोव्यातील रानभाज्यांच्या संवर्धनाची आवश्यकता

या भाज्या कुणी लावलेल्या, पेरलेल्या नाहीत. पहिल्या पावसानंतर आपोआप उगवून येतात आणि म्हणून त्या फक्त याच पावसाळी दिवसात मिळतात. पावसाळी दिवसात या साऱ्या रानभाज्या खायला हव्यात कारण यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे भरपूर पोषणमूल्य आहे. कॅल्शियम, लोह, फायबर सारखे गुणधर्म आहेत यामुळे पावसाळ्यात शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे देखील मिळतात. पण या भाज्यांचे जतनदेखील करणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या काळात आपोआप उगवून येणाऱ्या या भाज्या मुळासकट न तोडता त्याची फक्त पाने तोडावीत. आपण स्वतः या भाज्या लावत नाही, पण किमान या भाज्या टिकतील आणि पुढच्या पिढीलादेखील खायला मिळतील असे प्रयत्न आपण करुया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com