Konkan Railway: मालवाहतुकीचा वेग वाढला, पण क्षमता मर्यादित! कोकण रेल्वेवर ट्रॅफिक जाम; दुहेरीकरणासह आधुनिक सिग्नलिंगची गरज

Konkan Railway Capacity Expansion: मालवाहतुकीचा वेग वाढला, पण क्षमता मर्यादित! कोकण रेल्वेवर ट्रॅफिक जाम; दुहेरीकरणासह आधुनिक सिग्नलिंगची गरज.
Konkan Railway capacity expansion
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

कोकण रेल्वेवरील वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गाच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे. दुहेरीकरण, आधुनिक सिग्नल प्रणाली, अतिरिक्त लूप लाईन्स आणि पायाभूत सुविधांचे बळकटीकरण या उपाययोजनांना गती दिल्यास प्रवासी व मालवाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. देशाच्या पश्चिम किनारपट्टीला जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेता अधिक सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

रोहा-मडगाव मार्गाचा क्षमतेहून १४५ टक्के अधिक वापर

कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते मडगाव हा टप्पा सध्या आपल्या क्षमतेच्या तब्बल १४५ टक्के वापरला जात असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच या मार्गावरील रेल्वे वाहतूक उपलब्ध क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात सुरू असून, प्रवासी तसेच मालवाहतुकीचा वाढता ताण या विभागावर स्पष्टपणे दिसून येत आहे. परिणामी अनेक गाड्यांना मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करावी लागते, वेळापत्रक बिघडते आणि नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यासही मर्यादा निर्माण होत आहेत.

Konkan Railway capacity expansion
Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

दुपदरीकरणासाठी सर्वेक्षण

कोकण रेल्वेच्या अखत्यारीतील एकूण ७३९ किलोमीटर मार्गापैकी रोहा–वीर आणि मडगाव–माजोर्डा या विभागांतील सुमारे ५५ किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. याशिवाय, मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी २६३ किलोमीटर लांबीच्या निवडक विभागांचे दुपदरीकरण करण्यासाठी व्यवहार्यता सर्वेक्षण (फिजिबिलिटी सर्व्हे) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांची वाढ; १२ अतिरिक्त लूप लाईन्स

कोकण रेल्वे मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी गेल्या दहा वर्षांत रोहा ते मडगाव दरम्यान आठ नवीन क्रॉसिंग स्थानके (एकेरी मार्गावर गाड्या एकमेकांना ओलांडण्यासाठीची स्थानके) आणि 12 अतिरिक्त लूप लाईन्स(मुख्य रेल्वेमार्गाला समांतर असलेला अतिरिक्त मार्ग) उभारण्यात आल्या आहेत. सापे-वामणे, कळंबणी, कडवई, वरवडे (वेरावली), खारेपाटण, आचिरणे, इंदापूर आणि गोरेगाव रोड येथे नवीन क्रॉसिंग स्थानके उभारण्यात आली. तसेच विन्हेरे, अंजनी, सावर्डे, अडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सावंतवाडी रोड (२), करंजाडी, मडगाव आणि चिपळूण येथे १२ अतिरिक्त लूप लाईन्स विकसित करण्यात आल्या आहेत.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांच्या ५७ जोड्या, म्हणजेच दररोज ११४ फेऱ्या सुरू आहेत. बहुतांश मेल आणि एक्सप्रेस गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत.

Konkan Railway capacity expansion
Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

विशेष ट्रेन्स

याशिवाय, कोकण रेल्वेवरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी २०२५-२६ दरम्यान विविध सण, उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्यांच्या काळात ३८१ गणपती विशेष, २४९ उन्हाळा विशेष , १४८ हिवाळा विशेष आणि इतर १३६६ विशेष गाड्या चालवण्यात आल्या.

बिगर वातानुकूलीत डबे

भारतीय रेल्वे, प्रवाशांच्या मागणीवर सतत लक्ष ठेवते आणि नवीन गाड्या सुरू करून, सेवांचा विस्तार करून, फेऱ्या वाढवून आणि तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी स्वरूपात गाड्यांचे डबे वाढवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते. आरक्षित नसलेल्या प्रवाशांची गरज लक्षात घेऊन २०२५-२६ मध्ये कायमस्वरूपी क्षमता वाढवण्यासाठी सुमारे ८७० अतिरिक्त डबे जोडण्यात आले. त्यापैकी १६० डबे सामान्य श्रेणीचे (जनरल) आहेत. या डब्यांचा लाभ कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांनाही झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com