International Men Day 2022: वडील, भाऊ, बॉयफ्रेंड यांना गिफ्ट द्यायचयं..तर मग जाणून घ्या हे बेस्ट ऑप्शन
International Men Day: बर्थडे, दिवाळी, व्हॅलेनटाईन डे अथवा इतर खास दिवशी मुलींना गिफ्ट देण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर अनेक पर्याय येतात. पण जेव्हा प्रश्न मुलांचा येतो. त्यांना काय खास गिफ्ट द्यायचे? याविषयी मुलींचा खूप गोंधळ उडतो. असं काय गिफ्ट द्यावं?
ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर छान स्माईल येईल, त्यांना ते गिफ्ट कायम आठवणीत राहील. हाच मोठा प्रश्न मुलींना पडतो. पण काळजी करु नका. तुमचा नवरा, वडील, भाऊ, बॉयफ्रेंड, मित्र यांना गिफ्ट देण्याचे काही बेस्ट पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आज 'इंटरनॅशनल मेन्स डे' आहे. कुटुंब व्यवस्थेत, समाजात महिलांना खंबीर साथ देणाऱ्या पुरुषाचे फार कमी वेळा आभार मानले जाते तर या निमित्ताने तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला छान गिफ्ट देऊ शकता. गिफ्ट देण्याचे काही बेस्ट पर्याय पुढीलप्रमाणे सांगता येतील.
बियर्ड ग्रुमिंग किट मागील अनेक वर्षांपासून पुरुष (Men) मोठ्या प्रमाणात वापरताना दिसतात. पुरुषांमध्ये बियर्ड ग्रुमिंग किट फेमस आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला बियर्ड ग्रुमिंग किट देऊ कता.

पुस्तक अभ्यासाची, वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला पुस्तक गिफ्ट करणे, चांगले ठरु शकते. आजकाल ई-बुक्सचा पण छान पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही याचे सब्सक्रिप्शन घेऊन देऊ शकता.
व्यायामाची साधने फिटनेसची आवड असणाऱ्या व्यक्तीला योगा मॅट, रनिंग शूज, स्किपिंग रोप या व्यायाम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तु तुम्ही गिफ्ट (Gift) म्हणून देऊ शकता.

पैशाचे पाकीट चांगल्या ब्रंड आणि कलरचे वॉलेट तु्म्ही गिफ्ट केले तर ते पुरुषांना नक्कीच आवडते.
गॉगल गॉगल घातल्यामुळे ऊन्हापासून, धुळीपासून डोळ्यांचे संरक्षण होते. तसेच गॉगल घातल्यावर मुलं अधिक स्टायलिश दिसतात. गॉगल हा पण गिफ्टचा बेस्ट पर्याय आहे.
कस्टमाइज गिफ्ट मोबाईल कव्हर, टीशर्ट, कॉफी मग यावर तुम्ही खास आठवणीतला फोटो, काही शब्द छापू शकता. हा पण गिफ्टचा बेस्ट पर्याय आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.