संपादकीय: इन्स्टाग्रामवर हरलेले सत्ताधीश

Social Media Politics: तरुण पिढीसाठी ट्विटर आणि फेसबुक हे ‘अंकल-आंटी’ लोकांचे अड्डे आहेत. त्यांनी आपले संघटन इन्स्टाग्रामवर केले.
Social Media Politics
Social MediaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कौस्तुभ नाईक

तरुण पिढीसाठी ट्विटर आणि फेसबुक हे ‘अंकल-आंटी’ लोकांचे अड्डे आहेत. त्यांनी आपले संघटन इन्स्टाग्रामवर केले. हे व्यासपीठ सामाजिक संबंधांवर नव्हे, तर मशीन लर्निंगवर चालणाऱ्या ‘इंटरेस्ट ग्राफ’वर आधारित आहे. इथे नवा रील आधी अल्गोरिदमने निवडलेल्या छोट्या गटाला दाखवला जातो. त्या गटाने तो पूर्ण पाहिला किंवा पुन्हा पाहिला, तरच तो मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत जातो.

अलीकडेच दिल्लीच्या जंतर-मंतरवर आणि देशातल्या इतर भागांत झालेल्या सीजेपी आंदोलनात लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आंदोलकांच्या हातात कोणत्याही पक्षाचे झेंडे नव्हते. त्यांच्या घोषणा नवीन होत्या आणि बहुतांश चेहरे तरुण होते. हे ‘जेन झी’चे आंदोलन आहे, यावर सर्वांचे एकमत झाले.

Social Media Politics
Goa Politics: गोव्यात महाआघाडीचे समीकरण जुळणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सहभागाची शक्यता

वर्गात एक अक्षरही न बोलता बसणाऱ्या याच पिढीने कठोर यंत्रणा राबवणाऱ्या सरकारला झुकवले. हा बदल समजून घ्यायचा असेल, तर ही पिढी तंत्रज्ञानाकडे कशी बघते हे समजून घ्यावे लागेल. माझा जन्म १९९१चा आहे. नोकिया फोनपासून स्वस्त मोबाईल डेटापर्यंतचा प्रवास आमच्या पिढीने पाहिला. सतत कनेक्टेड नसलेले आयुष्य आम्हाला आठवते. जंतर-मंतरवरच्या तरुणांसाठी इंटरनेट रोजच्या जीवनाचा भाग आहे. कोरोना टाळेबंदीत त्यांचे सामाजिक जीवन पूर्णपणे स्क्रीनपुरते मर्यादित झाले. त्यामुळे राजकीय संघटनासाठी ते तंत्रज्ञान अगदी वेगळ्या पद्धतीने वापरतात.

भाजप हा माध्यमांवर नियंत्रण ठेवून आपली प्रतिमा घडवणारा पक्ष मानला जातो. नुकतेच कोणीतरी म्हटले की भाजप व्हॉट्सॲपवर तयार झाला आणि इन्स्टाग्रामवर हरला. २०१२ ते २०१६ दरम्यान पक्षाने ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर मजबूत डिजिटल यंत्रणा उभी केली. टीकाकारांवर ट्रोल्सच्या फौजा तुटून पडत असत. त्याला कंटाळून अनेक पत्रकार आणि विचारवंत ऑनलाइन चर्चेतून बाहेर पडले. ट्विटरवर बॉट्सच्या मदतीने पंधरा मिनिटांत हॅशटॅग ट्रेंड करवले जात. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंटेंट तपासणारी पथके काढून टाकली गेली.

पैशांच्या बदल्यात मिळणाऱ्या ‘ब्लू टिक’मुळे खोट्या बातम्यांना बळ मिळाले. व्हॉट्सॲपवर ओळखीच्या व्यक्तीकडून आलेला मेसेज पडताळणी न करता खरा मानला जातो. याचा फायदा घेऊन करोडो फोनवर संदेश पोहोचवले गेले. फेसबुकचे अल्गोरिदम वापरकर्त्यांच्या संवादानुसार फीड दाखवते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने तयार केलेले एकसंध कथानक समन्वित कार्यकर्त्यांच्या जाळ्यातून लाखोंपर्यंत पोहोचवता आले. लष्कराच्या प्रचाराने २०१७च्या रोहिंग्या नरसंहारात निर्णायक भूमिका बजावल्याचा निष्कर्ष युनोच्या तपासकर्त्यांनी काढला. या सर्व व्यासपीठांवर यश हे फॉलोअर्सच्या संख्येवर आणि पगारी प्रचारकांच्या संख्याबळावर अवलंबून होते.

पण तरुण पिढीसाठी ट्विटर आणि फेसबुक हे ‘अंकल-आंटी’ लोकांचे अड्डे आहेत. त्यांनी आपले संघटन इन्स्टाग्रामवर केले. हे व्यासपीठ सामाजिक संबंधांवर नव्हे, तर मशीन लर्निंगवर चालणाऱ्या ‘इंटरेस्ट ग्राफ’वर आधारित आहे. इथे नवा रील आधी अल्गोरिदमने निवडलेल्या छोट्या गटाला दाखवला जातो. त्या गटाने तो पूर्ण पाहिला किंवा पुन्हा पाहिला, तरच तो मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत जातो. त्यामुळे लाखो फॉलोअर्स असलेल्या खात्याचा व्हिडिओ काही हजार व्ह्यूजवर थांबू शकतो.उलट पन्नास फॉलोअर्सचे खातेही दोन दिवसांत लाखोंपर्यंत पोहोचू शकते.

Social Media Politics
Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

जेन झीची संस्कृती उपरोध, स्वतःवरच विनोद करण्याची अफाट क्षमता आणि विसंगती यांवर उभी आहे. अशा पिढीसमोर तिलाच ‘राष्ट्रविरोधी शक्ती’ ठरवण्याचा प्रयत्न हास्यास्पद वाटतो. शिवाय मेसेजेस व व्हॉट्सऍपवरचा प्रचार जवळपास फुकट असतो. प्रभावी रील्ससाठी मात्र संपादक, पटकथालेखक व कॅमेऱ्यासमोर विश्वासार्ह वाटणारे चेहरे लागतात. वरून तयार केलेले चकचकीत व्हिडिओ अल्गोरिदम आणि प्रेक्षक दोघेही नाकारतात. एकसारख्या व्हिडिओंचे नमुने स्पॅम म्हणून ओळखले जातात.

उलट प्रत्येक आंदोलकाने स्वतःच्या अनुभवातून बनवलेला वेगळा व्हिडिओ या प्रणालीशी नैसर्गिकरीत्या जुळतो.याचे ठळक उदाहरण म्हणजे पंतप्रधान मोदींनी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेला सेल्फी व्हिडिओ. त्यात सुरुवातीचा हुक नव्हता, कॅमेऱ्याचा कोन विचित्र होता. तरीही २४ तासांत ३० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. कारण तरुणांनी तो खिल्ली उडवण्यासाठी व मीम्स बनवण्यासाठी एकमेकांना पाठवला. प्रचारयंत्रणेला हे डिजिटल यश वाटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com