विस्कटलेली 'इंडिया', भरकटलेले विरोधक

Assembly Election Results Impact: नवी दिल्लीत सहा जून रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
India Alliance
India AllianceDainik Gomantak
Published on
Updated on

तमिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन आणि पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव, तसेच तमिळनाडूमध्ये काँग्रेसने ‘डीएमके’ची साथ सोडून ‘टीव्हीके’बरोबर सत्तेत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय यामुळे, ‘इंडिया’ आघाडीसमोर मोठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. आम आदमी पक्षाचेही ‘एकला चलो’ धोरण असते. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्लाही अनेक वेळा इंडिया आघाडीच्या भूमिकेविरोधात मत व्यक्त करतात.

India Alliance
Goa Opinion: ‘प्रभु व्हायोलेटा’ प्रकरणातून निर्माण झालेले नवे प्रश्न

नवी दिल्लीत सहा जून रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यानिमित्त आढावा. नुकत्याच झालेल्या पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळम, आसाम व पुदुच्चेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आली; तर तमिळनाडूत ‘टीव्हीके’ व केरळमध्ये काॅंग्रेस आघाडी सत्तेवर आली.

तमिळनाडूत ‘डीएमके’चे स्टॅलिन, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी व केरळममध्ये डाव्या आघाडीचे विजयन या कट्टर भाजपविरोधी नेत्यांना पराभव पत्करावा लागला. परिणामी इंडिया आघाडीलाही प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागले. तमिळनाडूत ‘डीएमके’ व काँग्रेसची अनेक वर्षांपासूनची आघाडी काँग्रेसच्या ‘टीव्हीके’ सरकारला पाठिंबा देण्याच्या निर्णयाने संपुष्टात आली आहे. यापुढे तिथे नवी समीकरणे उदयाला येऊ शकतील.

India Alliance
सालाझारने गोवा हा पोर्तुगालचाच एक ‘ऑफशोर’ प्रांत आहे अशी उठवलेली आवईही कुठल्याही तणावाशिवाय आपण पचवली; ओपिनियन पोलचे कवित्व

लोकसभेमध्ये विरोधी बाकांवर काँग्रेससोबत बसण्याची व्यवस्था नको, असे म्हणत द्रमुकने लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र आसन व्यवस्थेची मागणी केली आहे. केरळममध्ये इंडिया आघाडीतीलच काॅंग्रेस व डावी आघाडी यांच्यातच प्रमुख लढाई झाली. आता पुन्हा या दोन्ही आघाड्या मतभेद विसरून एकत्र येणार का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण दोन्ही बाजूला इंडिया आघाडीचेच घटक पक्ष असल्याने फार चिंता करावी, अशी स्थिती नाही.

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. तसेच इंडिया आघाडीतील तृणमूल व काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले आहेत. निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांचे सांत्वन केले असले तरी हे दोन्ही पक्ष आगामी काळात किती व कसे जवळ येणार, हा प्रश्नच आहे. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतरही अनेकदा या आघाडीच्या विरोधात विविध विषयांवर भूमिका घेतली होती.

India Alliance
अग्रलेख: एका दिवसात 5 ठिकाणी आंदोलने होणे हा योगायोग नाही! उभयतांनी संवादच टाळला तर प्रश्‍न सुटायचे कसे?

आसाममध्ये इंडिया आघाडीतील काॅंग्रेस या प्रमुख पक्षाची कामगिरी फारच सुमार झाल्याने इंडिया आघाडी इथे संकटात आहे. या पाचही राज्यांत असलेल्या लोकसभेच्या एकूण ११६ जागांपैकी तब्बल ९२ जागा इंडिया आघाडीने मिळवल्या होत्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केवळ २४ जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे इंडिया आघाडी म्हणून या जागा पुन्हा राखणे मोठे आव्हान आहे. या उलट राष्ट्रीय लोकशाही आघाडीला नवीन ठिकाणी आपला पक्ष/आघाडीच्या जागा वाढविण्याची संधी मिळाली आहे.

राहुल गांधी

काँग्रेसमधील काही लोक आणि इतर लोक तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद साजरा करत आहेत. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आसाम व बंगालमधील लोकांचा कौल हिरावून घेणे, हे लोकशाही संपुष्टात आणण्याच्या भाजपच्या मोहिमेतील एक मोठे पाऊल आहे. आता मतभेद विसरण्याची, लोकशाही वाचवण्यासाठी थेट काम करण्याची वेळ आली आहे.

India Alliance
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर माझ्याशी संपर्क साधून पाठिंबा दर्शविणाऱ्या इंडिया आघाडीतील सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव, हेमंत सोरेन आणि तेजस्वी यादव यांची कृतज्ञ आहे. माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे. मला सामान्य माणूस म्हणून जगायचे असून फक्त जनतेची काळजी आहे. इंडिया आघाडीला मजबूत करण्यासाठी करेन.

भारतीय जनता पक्ष

सहा जूनची बैठक म्हणजे पराभवानंतरच्या हतोत्साहींची एकत्र आलेली गर्दी आहे. पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्यांमध्ये जनतेने विरोधकांच्या कारभाराला पूर्णपणे नाकारल्यामुळे मतदारांना त्यांच्यातील विरोधाभास नीट समजल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत कितीही रणनीती आखल्या, तरी या आघाडीकडे कोणताही ठोस सकारात्मक विचार किंवा कोणताही खरा नेता नाही, हे लपणार नाही. हा फक्त एकत्र आलेला स्वार्थी गट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com