Keladi Nayaka Dynasty History: शूर राणी चेन्नम्मा: जिने औरंगजेबाचा 'फर्मान' धुडकावून छत्रपती राजाराम महाराजांना दिले अभय!

Keladi Nayaka Dynasty: लिकोटच्या लढाईत जानेवारी १५६५मध्ये विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर केलाडी घराणे प्रसिद्धीस आले.
Keladi Nayaka Dynasty History
Keladi Nayaka Dynasty History्ोगलगक ुदसोलूोक
Published on
Updated on

लिकोटच्या लढाईत जानेवारी १५६५मध्ये विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर केलाडी घराणे प्रसिद्धीस आले. केलाडी हे शिमोगा जिल्ह्यातील नगर येथून राज्य करणारे घराणे, म्हैसूर सुलतान हैदर अलीने हा प्रदेश जिंकल्यानंतर १७६३मध्ये या राजवंशाचा अंत झाला. केलाडी राजवंश दोन भावांनी चौडाप्पा व त्याचा भाऊ भद्रप्पा याच्या पाठिंब्याने एक लहानसे सैन्य उभे करून आणि केलाडीच्या आसपासच्या गावांवर ताबा मिळवून केला होता, ज्याकडे विजयनगरच्या राज्यकर्त्यांचे लगेच लक्ष गेले आणि त्यांना दरबारात बोलावण्यात आले. दोन्ही बांधवांनी आपली निष्ठा दाखवली आणि त्यांना केलाडीच्या आसपासच्या डोंगराळ प्रदेशावर कारभार करण्याची परवानगी देण्यात आली.

केलाडींच्या नियंत्रणाखाली असलेला अंदाजे प्रदेश मालेनाडू म्हणून ओळखला जातो. संपूर्ण शिवमोगा (शिमोगा) जिल्हा, उत्तर कर्नाटकाचा काही भाग आणि संपूर्ण दक्षिण कर्नाटक, कासरगोडपर्यंत पसरलेला, तुमकूर, चित्रदुर्ग, चिकमंगळूर, हसन, कोडागु (कूर्ग)चा काही भाग केलाडींच्या कक्षेत होता.केलाडी ही केलाडी नायक राजघराण्याची पहिली राजधानी जी नंतर १५६०मध्ये इक्केरी येथे आणि शेवटी १६३९मध्ये बिदनूर येथे हलविण्यात आली. शिवप्पा नायका (१६४५-१६६०) हे केलाडी शासकांपैकी सर्वांत सक्षम आणि श्रेष्ठ मानले जातात. ते वीरभद्र नायकाचे काका होते. शिवप्पाने आपल्या पुतण्याला केलाडीचे सिंहासन मिळवून दिले. ते केवळ सक्षम प्रशासक नव्हते तर त्यांनी साहित्य आणि ललित कलांनाही संरक्षण दिले.

Keladi Nayaka Dynasty History
Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

विजापूरचे सुलतान, म्हैसूरचे राजे, पोर्तुगीज आणि पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील शेजारच्या प्रदेशातील इतर नायकांविरुद्धच्या त्याच्या यशस्वी मोहिमांमुळे सध्याच्या कर्नाटकातील मोठ्या प्रदेशाचा विस्तार होण्यास मदत झाली. त्यांनी शेतीला महत्त्व दिले आणि कर आणि महसूल गोळा करण्यासाठी नवीन योजना विकसित केल्या ज्यामुळे नंतरच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून त्यांची प्रशंसा झाली. विजापूरने मुघलांशी शांतता करार केला होता आणि दक्षिणेकडील या तहाचा एक भाग म्हणून शाहजी राजे भोसले विजापूरच्या सेवेत होते.

१६७५मध्ये गोव्याच्या फोंडा किल्ल्याला वेढा घालण्यासाठी ४० जहाजे समुद्रमार्गे रवाना करताना, अणाजी दत्तोला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत: दक्षिणेकडे प्रस्थान केले आणि ६ मे १६७५ रोजी बिदनूर ताब्यात घेतले. ते या भागात असताना, राणी चेन्नम्मा या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या केलाडीच्या राणीने मदत मागितली कारण तिम्मन्ना नाईक विरुद्ध, राणी चेन्नम्मानी बंड केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलाडी चेन्नम्मा यांनी मान्य केलेल्या चौथचे कर लागू केल्यानंतर बिदनूर येथील गृहयुद्धात तिला मदत केली.

बऱ्याच वर्षांनी पुढे छत्रपती संभाजीच्या मृत्यूनंतर, छत्रपती राजाराम रायगडच्या वेढ्यातून निसटला आणि १६८९मध्ये बादशहा औरंजेबाच्या सैन्याने पाठलाग करून दक्षिणेकडे जिंजीच्या दिशेने निघाला. तो तुंगभद्राजवळ थोडक्यात निसटला आणि शूर राणी केलाडी चेन्नमाने त्याला आश्रय दिला, औरंगजेबाने तिला ‘राजारामला शरण दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. तिने या धमकीकडे लक्ष दिले नाही. मुघल सैन्याने आक्रमण केले, परंतु तिचे मोठे नुकसान झाले असले तरी त्यांचा पराभव झाला. यामुळे १६८९च्या उत्तरार्धात छत्रपती राजाराम महाराज सुरक्षितपणे जिंजीला पोहोचू शकले.

कालांतराने १७५४पर्यंत, बिदनूरवर राणी विरम्माजी या यशस्वी केलाडी प्रशासकाचे राज्य होते. तिला सोमशेखर (तृतीय) हा दत्तक मुलगा होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या पराभवामुळे हैदर अलीने १७६३मध्ये चित्रदुर्ग नायकासह बिदनूरवर हल्ला केला आणि राणी विरम्माजी आणि सोमशेखर (तृतीय) यांना मधुगिरी येथे बंदिवासात ठेवले. केलाडी राजघराण्याच्या वैभवशाली युगाचा हा शेवट होता. १७६७मध्ये, माधवराव पेशवे प्रथम यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने मधुगिरी ताब्यात घेतली, वीरम्माजी आणि तिचा दत्तक मुलगा सोमशेखर (तृतीय) यांना तुरुंगातून सोडले. मराठ्यांची राजधानी पुणे येथे प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Keladi Nayaka Dynasty History
Goa Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा भेदला, मॅजिस्ट्रेटचे खोटे सोंग उघड; साताऱ्यात संशयित जेरबंद

केलाडी नायक हे वीरशैव होते त्यांनी धर्माचे संरक्षण केले असंख्य मठ बांधले आणि वीरशैव धर्माचा प्रसार मालेनाडू आणि किनारपट्टी कर्नाटकात केला. केलाडी नायकांनी इक्केरी आणि केलाडी येथे कदंब, होयसळ, विजयनगर आणि द्रविड शैलींचा वापर करून काही उत्तम मंदिरे बांधली. त्यांच्या बांधकामासाठी ग्रॅनाईटचा वापर जास्त दर्शवितो व त्यांनी वास्तुकलेत विजयनगर शैलींचे अनुसरण केले. इक्केरी येथील अघोरेश्वर मंदिर आणि केलाडी येथील रामेश्वर मंदिर ही नायकांच्या कलेची उत्तम उदाहरणे.

हंपी मध्ये दिसल्याप्रमाणे घोडे आणि सिंहांचे चित्रण केलेले विजयनगर-शैलीचे खांब येथे आढळतात. घोडे आणि सिंहांचे चित्रण केलेल्या केलाडी येथील रामेश्वर मंदिर खांबांना याली स्तंभ म्हणतात, ज्यात घोड्यांचे पुढचे पाय उंचावलेले आहेत, त्याच्या मागील पायांवर तोल आणि पाठीवर सशस्त्र स्वार आहेत. इक्केरी येथे तसेच केलाडी येथे पण ‘गंडबेरुंड’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकातील पौराणिक कथेतला दोन डोके असलेला पक्षी चित्रित करणारे छतावरील शिल्प आढळते. तसेच, रामेश्वराच्या मंदिरात, स्तंभाच्या शिल्पात मराठा छत्रपती राजाराम व केलाडी चेन्नम्मा यांचे शिल्प आढळते.

- सर्वेश बोरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com