Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

Feista do Pavo Panaji: ‘लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी’ हे घोषवाक्य असलेला हा महोत्सव मूलभूतपणे लोकांचा उत्सव ठरतो.‌ गोव्यातील संस्कृती, पर्यावरण वारसा हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
Feista do Pavo Panaji
Feista do Pavo PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

फेस्ता दो पावो’ हा खाद्यपदार्थ आणि संगीत केंद्रस्थानी असलेला महोत्सव २४ आणि २५ जानेवारी रोजी पणजीत पुन्हा परततो आहे.‌ या लोकप्रिय महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.

‘फेस्ता दो पावो’ या रोमांचक महोत्सवाची विशेषता ही आहे की त्यात स्थानिक घरगुती शेफ आणि पणजी शहरातील प्रस्थापित रेस्टॉरंटचे‌ स्टॉल असतात, जे गोव्याच्या समृद्ध पाककृतींच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आस्वादांचा अनुभव आपण या महोत्सवात घेऊ शकता. स्थानिक पेये आणि मद्य यांची ओळख करून देणारी फेणी ब्रिज बार आणि ब्रिवरीज स्टेशन ही या महोत्सवातील आणखीन काही विशेष आकर्षणे आहेत.

‘लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी’ हे घोषवाक्य असलेला हा महोत्सव मूलभूतपणे लोकांचा उत्सव ठरतो.‌ हा महोत्सव पाटो प्लाझा येथील कांदळवनाच्या बाजूने असलेल्या पादचारी मार्गावर आयोजित केला जाणार आहे. गोव्यातील संस्कृती, पर्यावरण वारसा आणि सौहार्द साजरा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

Feista do Pavo Panaji
राज्यात 'Three Kings Feast'ची धूम! कासावली, चांदोर, रेइस मागोसमध्ये भक्तीचा उत्साह

दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात किड्स कॉयर, ब्रास बँड, जाझ बँड, पर्पल रेन बॅंड आणि फोरफ्रंट बँड यांचे संगीत असेल. गोव्याच्या शिगमोत्सवात लोकप्रिय असलेले दिवली नृत्य, ढोल-ताशा यांचाही समावेश आहे त्याशिवाय सांबा नर्तक आणि व्योमी डान्स ग्रुप हेदेखील आपले कार्यक्रम या महोत्सवात सादर करतील.

Feista do Pavo Panaji
Saint Francis Xavier Feast: जुने गोवेत भाविकांचा 'पूर'; नेते, मान्यवरांची उपस्थिती; राहुल गांधी, केजरीवालांकडून शुभेच्छा

‘लोकांचा उत्सव’ रंगणार

‘फेस्ता दो पावो’ या पोर्तुगीज शब्दांचा अर्थ लोकांचा उत्सव असा होतो. पहिल्या वर्षी हा महोत्सव पाटोजवळच्या ‘साओ टोम’मधील गल्लीबोळात झाला होता. या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद लाभला. मात्र, ती जागा अपुरी ठरल्याने पुढील वर्षी हा महोत्सव तिथल्या ओरे खाडीच्या पलीकडे असलेल्या पादचारी मार्गावर आयोजित झाला आणि त्यालाही प्रचंड प्रतिसाद लाभला. यंदाही तो त्याच जागी आयोजित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com