

भारतामध्ये उपोषणाच्या लढ्याची एक परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांच्या सत्तेविरोधात हे अस्त्र वापरले. आता अनेक संदर्भ बदलले असले तरी सोनम वांगचूक यांच्या उपोषणामुळे अशा आंदोलनांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांचे उपोषण आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या झेंड्याखाली ंसंसदेवर नेण्यात आलेला धडक मोर्चा ही आंदोलने सरकारने ज्या पद्धतीने हाताळली, त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची चर्चा आणि आजवरच्या अशाप्रकारच्या आंदोलनांच्या इतिहासावर एक धावती नजर.
निर्भया बलात्कार आणि हत्याकांडामुळे हादरलेल्या देशवासीयांनी २२ आणि २३ डिसेंबर २०१२ रोजी रायसीना हिल्सवरील राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटपर्यंत हजारोंच्या संख्येने गोळा होऊन अतिशय उग्र निदर्शने केली होती. त्या आंदोलनामुळे दोन दिवस राष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचे तसेच संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयांची कार्यालये असलेले साऊथ ब्लॉक आणि गृह व वित्त मंत्रालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. आंदोलकांना पांगविण्यासाठी ऐन कडाक्याच्या थंडीत पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करावा लागला होता. मात्र, त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे आंदोलकांचा मोर्चा संसदेकडे वळला नव्हता. परीक्षा पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळ्यांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून संसद भवनावर काढण्यात आलेला मोर्चा हा जंतरमंतरमधून उद्भवलेला सर्वांत मोठा मोर्चा ठरला आहे.
भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि जतिंद्रनाथ दास यांनी तुरुंगामध्येच एकत्रित उपोषण सुरू केले. जतिंद्रनाथ यांचे ६३व्या दिवशी उपोषणामुळे निधन झाले.
पोट्टी श्रीरामुलू यांनी तेलुगू भाषकांसाठी वेगळे राज्य व्हावे म्हणून १९५२मध्ये उपोषणास सुरुवात केली. पंतप्रधान नेहरू यांनी विरोध केला. उपोषणाच्या ५८व्या दिवशी निधन. यानंतर आंध्र प्रदेशात आंदोलनाचा भडका उडाला. या आंदोलनामुळे तेलुगू भाषकांसाठी वेगळ्या आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली.
कैद्यांसाठीचे प्रायश्चित्त म्हणून दक्षिण आफ्रिकेतील फिनिक्स येथे केले. दीर्घ उपोषण (२१ दिवस) धार्मिक आणि सामाजिक सलोख्यासाठी आणि ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीला विरोध.
‘अफ्स्फा’ कायद्याला विरोध करत इरोम शर्मिलांनी ५ नोव्हेंबर २०००मध्ये उपोषण सुरू केले. विविध राज्यांमध्ये अटक. तब्बल सोळा वर्षांपासून अधिक काळ अशा पद्धतीने लढा देत त्यांनी विक्रम नोंदविला. उपोषणाचा मार्ग सोडल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला पण हा प्रयत्नही निष्फळ ठरला.
अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्यासाठी ऑगस्ट २०११ मध्ये उपोषण सुरू केले. हे उपोषण अकरा दिवस चालले. रामलिला मैदानावरील आंदोलनास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे लोकपाल विधेयक मंजूर झाले आणि १६ जाने २०१४ पासून त्याची अंमलबजावणी सुरू.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी २०१३ मध्ये वाढीव वीज आणि पाणी देयकांना विरोध दर्शविण्यासाठी पंधरा दिवस उपोषण केले. यामुळे ‘आप’चा दिल्लीच्या राजकारणातील प्रभाव वाढलाच पण त्याचबरोबर केजरीवालांचा ब्रँड प्रस्थापित झाला.
मेधा पाटकर (२००६) : सरदार सरोवराच्या उंचीतील वाढीस २० दिवस विरोध
ममता बॅनर्जी (२००६) : सिंगूर येथील टाटांच्या प्रकल्पास २६ विरोध दिवस
जी. डी. अग्रवाल (२०१८) :
गंगेच्या खोऱ्यातील पर्यावरणविरोधी प्रकल्पांना रोखणे दिवस: १११
(अग्रवाल यांचा तीव्र उपोषणामुळे जून २०१८ मध्ये उपोषणाच्या १११ व्या दिवशी मृत्यू)
१४ जून ते ५ सप्टेंबर २०१५ दरम्यान ८७ दिवस चाललेले वन रँक, वन पेन्शन
१४ मार्च ते २३ एप्रिल २०१७ दरम्यान ४१ दिवस चाललेले तमिळनाडूच्या शेतकऱ्यांचे आंदोलन
१६ डिसेंबर २०१९ ते २४ मार्च २०२० पर्यंत १०१ दिवस शाहीनबाग येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरविरुद्ध चाललेले आंदोलन, जंतरमंतर येथे २१ दिवस चाललेली किसान संसद
ऑलिम्पिक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण झाल्याच्या आरोपावरून १८ ते २१ जानेवारी आणि २३ एप्रिल ते २८ मे २०२३ दरम्यान चाललेले आंदोलन
संसदेने संमत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीच्या विविध सीमांची कोंडी करणाऱ्या, ३८० दिवस चाललेले शेतकरी आंदोलन
केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्त नियुक्त करण्याच्या तसेच स्वामिनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मोदी सरकारविरुद्ध अण्णा हजारे यांनीही २३ ते २९ मार्च २०१८ दरम्यान रामलीला मैदानावर सुरू केलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थीने सोडविले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.