Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Hampi Vijayanagara Empire History: प्राचीन भारतातील सैन्यात हत्ती हे अत्यंत महत्त्वाचे घटक होते. पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे पारंपारिक सैन्यात चार मुख्य विभाग असत. हत्ती, घोडदळ, घोडेस्वार रथ आणि पायदळ.
Hampi Vijayanagara Empire History
Hampi HistoryAi Image Generator
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

विजयनगरात पाणीपुरवठ्या साठी हंपीमध्ये भूमिगत कालव्यांचे एक मोठे जाळे पहायला मिळते. या कालव्यांमधून मोठ्या संख्येने मंदिरे, पुष्करणी, स्नानगृहे आणि वापरल्या जाणाऱ्या जलमंडपांना पाणीपुरवठा केला जात असे. प्राचीन भारतातील सैन्यात हत्ती हे अत्यंत महत्त्वाचे घटक होते. पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे पारंपारिक सैन्यात चार मुख्य विभाग असत.

हत्ती, घोडदळ, घोडेस्वार रथ आणि पायदळ. हत्तीचा वापर राजा आणि सेनापती दोघांनाही युद्धात वाहून नेण्यासाठी केला जात असे. मध्ययुगीन भारतात हत्तींचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. हत्तींच्या व्यापारात कलिंग (सध्याचा ओडिशा), पेगू (सध्याचा म्यानमारचा भाग) आणि सिलोन (सध्याचा श्रीलंका) हे तीन प्रमुख निर्यातदार होते आणि त्यांचे ग्राहक विजयनगर, विजापूर, गोलकोंडा, तंजावर, मदुराई आणि बंगाल. सिलोनमधील हत्ती युद्धात सर्वोत्तम युद्ध हत्ती मानले जात आणि सिलोन हस्तिदंत उच्च दर्जाचे मिळे. विसाव्या शतकात ब्रिटिश भारतीय सैन्याने हत्तींचा वापर मालवाहतुकीसाठी केला.

Hampi Vijayanagara Empire History
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

भारत हा सिलोन हत्तींसाठी एक मोठी बाजारपेठ होती. सिंहली लोकांकडून पोर्तुगीजांनी हा व्यापार हस्तगत केला आणि त्यांच्या उत्कृष्ट जहाज बांधणी कौशल्याचा वापर करून त्यावर मक्तेदारी मिळवली. त्यांच्यानंतर डच लोकांनी सिलोनमधील व्यापार हाती घेतला. युद्धात घोड्यांचे महत्त्व आणि नियमित पुरवठा राखण्याची अडचण आणि महत्त्व पाहता त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर हत्तींच्या समांतर व्यापाराबद्दल फारशी माहिती नाही. हत्ती हे भारतातील मूळचे असल्याने आणि मोठ्या संख्येने पकडले गेले असल्याने त्यांच्या व्यापाराचा इतिहास व माहिती मिळत नाही.

विजयनगरातील प्रथम अरब व्यापाऱ्यांनी आणि नंतर पोर्तुगीजांनी घोड्यांच्या व्यापारावर मक्तेदारी मिळवली, विशेषतः विजयनगरच्या राजांकडून नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवासादरम्यान झालेल्या कोणत्याही प्राण्यांच्या मृत्यूसाठी पैसे मोजले जात असत, अशी माहिती सापडते. असेही मानले जाते की, विजयनगरातील हंपीमध्ये संपूर्ण विजयाविठ्ठल हा बाजार घोड्यांच्या व्यापारासाठी समर्पित होता. विजयनगरातील मंदिरावरील कोरीवकामांवर एक नजर टाकली तर विजयनगरच्या लोकांना हत्तीचे वर्चस्व व हत्तीबाबत ज्ञान आणि जवळचे नाते होते हे लक्षात येते. हंपी येथील प्रसिद्ध हत्तींचे तबेले विजयनगर राजांनी हत्तीचे किती महत्त्व ठेवले होते याची साक्ष देतात. शाही हत्तींना राहण्यासाठी बांधलेले हे एक विस्तृत आयताकृती बांधकाम ज्यामध्ये अकरा खोल्यांची एक रांग आहे व प्रत्येकी दोन हत्तींना राहण्यासाठी बांधले गेले होते. हे हंपीमध्ये अजूनही उभ्या असलेल्या वास्तुकलेचे उत्तम उदाहरण.

Hampi Vijayanagara Empire History
Goa Nightlife: बर्च अग्निकांडांत 25 जणांचा होरपळून मृत्यू; तरीही गोव्याची नाईट लाईफ बिनधास्त! धडा कधी शिकणार?

पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस कृष्णदेवरायांच्या महानवी उत्सवाचे दरबारात भेटी वेळी तपशीलवार वर्णन करतो ज्यामध्ये हत्तींबद्दलचा हा उतारा समाविष्ट आहे - ‘मखमली आणि सोन्याच्या कपड्यांनी मढवलेले युद्ध हत्तींची एक तुकडी, ज्यांच्यावर अनेक रंगांची झालर आणि समृद्ध कपडे आणि घंटा आहेत जेणेकरून पृथ्वी गुंजेल आणि त्यांच्या डोक्यावर राक्षस आणि इतर प्रकारच्या महान प्राण्यांचे चेहरे रंगवलेले आहेत. प्रत्येकाच्या मागे तीन किंवा चार पुरुष आहेत, त्यांनी रजाई केलेले अंगरखे घातलेले आहेत आणि ढाल आणि भाला घेतलेले आहेत.

१५०१ मध्ये भेट देणारे पोर्तुगीज प्रवासी डुआर्टे बार्बोसा म्हणतात की, राजाकडे नऊशेहून अधिक भव्य आणि सुंदर हत्ती होते जे युद्ध आणि राज्य दोन्हींसाठी वापरले जात होते. १६ व्या शतकातील पोर्तुगीज प्रवासी फर्नाव नुनिज विजयनगरच्या युद्धात वापरल्या जाणाऱ्या हत्तींचे वर्णन करतो.१४ व्या ते १६ व्या शतकात दक्षिणेतील सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून, विजयनगरकडे स्वतःचे विस्तृत हत्तींना पकडण्याची व्यवस्था होती.

हंपीमध्ये आढळणाऱ्या विस्तीर्ण अवशेषांमध्ये व असंख्य हत्तींच्या कोरीवकामांमध्ये हत्तींच्या व्यापाराचे पुरावे स्पष्टपणे आढळतात. कोरीवकामांमध्ये काम करणाऱ्या हत्तीच्या विविध शिल्पा मध्ये हत्ती पालनाच्या व दैनंदिन दृश्यांचा समावेश आहे. महानवमी दिब्बामध्ये वाघांची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हत्तींचे कोरीवकाम तसेच हत्तींचा वापर शिकारीसाठी स्वार म्हणून नव्हे तर शिकार मारण्यासाठी केला जात असे. हत्तींच्या लढाया हा आणखी एक शाही मनोरंजन खेळ आणि हत्ती विरुद्ध हत्ती किंवा वाघ, सिंह, बैल आणि अस्वल यांसारख्या इतर कोरीवकाम हंपीच्या भिंतींवर आढळते. हजारा राम मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कूच करणाऱ्या हत्तींच्या तुकडीसह महानवमी उत्सव कोरलेला आहे.

Hampi Vijayanagara Empire History
Goa Congress: काँग्रेसचेही कार्यालय तयार, निधी मिळताच उद्‌घाटन करू; अमित पाटकरांची माहिती

विजयनगरातील हंपीमध्ये प्रेक्षक सभागृहाच्या वायव्येस मोठा दगडी कुंड आणि हत्तीचा टाक आहे. हा कुंड १२ मीटर लांबीचा आणि २००० लिटरपेक्षा जास्त पाण्याचा साठा असलेला आहे. कदाचित त्या भागात काम करणाऱ्या किंवा राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्राण्यांसाठी पाणी साठवण्यासाठी याचा वापर केला जात असावा. कुंडाच्या एका बाजूला एक लहान छिद्र आहे, जे पाणी साठवताना बंद ठेवले जाते असावे. या छिद्रामुळे कुंड स्वच्छ करण्यापूर्वी किंवा पुन्हा भरण्यापूर्वी पाणी काढून टाकता येत असे. अनेबावी म्हणून ओळखले जाणारे टाके या कुंडाच्या नैऋत्येस स्थित आहे. हे टाके चौकोनी आहे आणि दक्षिणेला अरुंद पायऱ्या आहेत. त्याच्या पश्चिमेला असलेल्या हत्तीच्या शिल्पामुळे त्याला अनेबावी (हत्तीची विहीर) असे नाव मिळाले असावे. हत्तींना पाणी पिण्यासाठी हे सोयीचे असावे बहुदा.एका बाजूला एका हत्तीची छोटीशी मूर्ती आहे ज्यातून पाणी टाक्यांत वाहते.

पाणीपुरवठ्या साठी हंपीमध्ये भूमिगत कालव्यांचे एक मोठे जाळे पहायला मिळते. या कालव्यांमधून मोठ्या संख्येने मंदिरे, पुष्करणी (पायऱ्या असलेली पाण्याची टाकी), राणीच्या स्नानगृहासारखी स्नानगृहे आणि गरम दिवसात थंडावा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलमंडपांना पाणीपुरवठा केला जात असावा. या कालव्यांना पाणी थोड्या उंचावर असलेल्या कमलापूर तलावातून पुरवले जात असे. विजयनगरातील शाही आवारात विस्तीर्ण अवशेषांमध्ये घोड्यांना पाणी पिण्यासाठी एक दगडी १२ मीटर लांबीचा हौद आहे, जो पाणी साठवण्यासाठी वापरात होता ज्यातून ८ ते १० घोडे एकाच वेळी सोयीस्करपणे पाणी पित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com