Goa Butterfly Species: 'या वेलींवर, फुलांबरोबर.. गोड किती हसते'! गोव्यातील फुलपाखरांचे समृद्ध जग

Butterfly In Goa: पक्ष्यांप्रमाणेच गोव्यातील फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या देखील कमी नाही. भारतात फुलपाखरांच्या सुमारे १५०० प्रजाती आहेत त्यापैकी २५४ प्रजाती गोव्यात आढळतात.
Butterfly In Goa
Butterfly In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पक्ष्यांप्रमाणेच गोव्यातील फुलपाखरांच्या प्रजातींची संख्या देखील कमी नाही. भारतात फुलपाखरांच्या सुमारे १५०० प्रजाती आहेत त्यापैकी २५४ प्रजाती गोव्यात आढळतात. ''सदर्न बर्ड विंग'' हे देशातील आकाराने सर्वात मोठे असलेले फुलपाखरू गोव्यात आढळते.‌

फुलपाखरांच्या पाच ''फॅमिली'' गोव्यात आढळतात. त्यापैकी ‘स्वाॅलोटेल्स’ (किंवा पॅपिलिओनिडहेस्पिरीड) या फॅमिलीत हे फुलपाखरू येते. ‘लायसनिड’ किंवा ‘ब्लूज’ या फॅमिलीतील फुलपाखरा ंच्या वरच्या अंगावर निळ्या रंगांच्या छटा असतात त्यामुळे त्यांना ब्लूज असे नाव पडले आहे.‌

या फुलपाखरांच्या पार्श्वभागी असलेल्या शेपटीसदृश्य अवयवांमुळे, ती बसलेली असताना या फुलपाखरांचा पार्श्वभाग त्याच्या डोक्याच्या भागासारखा वाटतो त्यामुळे त्याची शिकार होता होता ते बचावले जाते. या फॅमिलीतील ‘एपफ्लाय’ या फुलपाखराची विशेषता ही आहे की ते सुरवंटावस्थेत असताना मऊ कीटकांवर जगते. इतर फुलपाखरे सुरवंटावस्थेत असताना हिरवी पाने खाऊन जगतात. ‌एपफ्लायचा सुरवंट मात्र मांसाहारी असतो.‌ ‘पायरेड’ ही फुलपाखरांची आणखी एक फॅमिली आहे.

या या फॅमिलीतील फुलपाखरे पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांची असल्यामुळे त्याला ''व्हाइट्स अँड यलोज'' असेही म्हटले जाते.‌ ‘निम्फालिड्स’ ही फुलपाखरांची सर्वात मोठी फॅमिली आहे. त्यांना ''ब्रश फुटेड बटरफ्लाईज'' म्हणूनही ओळखले जाते. आपल्या राज्याचे फुलपाखरू- मलबार ट्री निम्फ हे या फॅमिलीत येते. बहुदा कीटकांना पायांच्या तीन जोड्या असतात, मात्र ''ब्रश फुटेड बटरफ्लाईज'' फॅमिलीतील फुलपाखरांना जवळून निरखले असता त्यांना पायांच्या दोनच जोड्या असल्याचे आपल्या लक्षात येईल. त्यांचे पुढील पाय दुमडलेले असतात आणि त्यांवर ब्रशसारखी रचना असते.

म्हणून त्यांना ''ब्रश फुटेड'' असे म्हटले जाते. हेस्पिरीड (किंवा स्कीपर्स) या फॅमिलीतील फुलपाखरे ''पतंग आणि फुलपाखरू'' यामधे गणली जातात. वैज्ञानिक त्यांना पतंग मानत नाहीत मात्र त्यांना फुलपाखरु मानवे की नाही याबद्दल प्रश्नच असतो कारण फुलपाखरू किंवा पतंग यांच्यापेक्षा वेगळी वैशिष्ट्ये त्याने धारण केलेली आहेत.‌ या फॅमिलीतील ‘व्हाईट बँडेड ऑव्ल’ हे गोव्यात अलीकडे प्रथमच दृष्टीस पडले आहे.

Butterfly In Goa
Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

या फॅमिलीतील मातीतील नर अनेकदा  क्षार आणि खनिज शोषण्यासाठी ओल्या जमिनीवर एकत्र आलेले दिसतात. ही खनिजे त्यांना मिलन क्रियेसाठी आवश्यक असतात. गोव्यातील जंगले ही फुलपाखरे पाहण्याची उत्तम जागा आहे.‌ मला वनस्पतीबद्दल जे काही ठाऊक आहे ते मला फुलपाखरांनी शिकवले आहे.‌ ‘सौ. लेपिडोप्टेरा’ (पंख असलेले कीटक, ज्यात फुलपाखरांचाही समावेश होतो) या विद्यार्थ्यांच्या आवडत्या वनस्पतीशास्त्र शिक्षिका आहेत असा एक विनोद प्रचलित आहे.

Butterfly In Goa
Butterfly Walk: ..पंख चिमुकले, निळेजांभळे! करमळी तळ्यावर फुलपाखरांचा उत्सव; बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर

मात्र हे खरे आहे की जर तुम्हाला तुमची फुलपाखरे ठाऊक असतील तर तुम्हाला तुमचे वनस्पतीशास्त्रही ठाऊक झालेले असेल आणि तुम्ही जिथे राहता तिथे त्यांच्यासाठी अधिवासही तयार करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com