Butterfly Walk: ..पंख चिमुकले, निळेजांभळे! करमळी तळ्यावर फुलपाखरांचा उत्सव; बिग बटरफ्लाय मंथ सप्टेंबर

Carambolim Lake Butterfly: 'नागरिक विज्ञाना’चा भाग म्हणून डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या गोवा शाखेनेही या महिन्यात फुलपाखरांच्या संदर्भात कार्यशाळा आणि भ्रमंती (butterfly walk) यांचे आयोजन केले आहे.
Butterfly
ButterflyDainik Gomantak
Published on
Updated on

सप्टेंबर महिना हा भारतात 'बिग बटरफ्लाय मंथ' म्हणून साजरा करण्यात येतो. या महिन्यात फुलपाखरांचे निरीक्षण, त्यांचे दस्तऐवजीकरण याबाबतीत या महिन्यात फुलपाखरू प्रेमी विशेष कामगिरी बजावतात.‌ या उपक्रमाद्वारे नागरिकांना 'नागरिक विज्ञान' (citizen science) उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.‌

'नागरिक विज्ञाना’चा भाग म्हणून डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाच्या गोवा शाखेनेही या महिन्यात फुलपाखरांच्या संदर्भात कार्यशाळा आणि भ्रमंती (butterfly walk) यांचे आयोजन केले आहे. त्यापैकी एक फुलपाखरू भ्रमंती 21 सप्टेंबर रोजी, करमळी तळ्याच्या परिसरात पार पडली.

सकाळी 8 ते 9 या वेळेत निसर्ग अभ्यासिका वैष्णवी नाईक हिच्या नेतृत्वाखाली सुमारे 30 फुलपाखरू प्रेमींनी, ज्यात छोट्यांपासून वयस्कर व्यक्तींचा समावेश होता,  करमळी तळ्याचा परिसरात वेगवेगळ्या प्रजातींच्या फुलपाखरांची ओळख करून घेतली.

वैष्णवी नाईक

करमळी या प्रसिद्ध तळ्यापाशी अलीकडच्या काळात अनेक बांधकामांनी आकार घेत असला तरी फुलपाखरे ज्या झाडांच्या आधाराने जगतात ती झाडे/वनस्पती, उदाहरणार्थ घाणेरी (lantana camara), अजूनही तिथे तग धरून आहेत, त्यामुळे फुलपाखरांसाठी अजूनही हा परिसर निवासस्थान बनून आहे. अगदी दुर्मिळ नसली तरी सामान्य प्रजातीची फुलपाखरे इथे मुबलक दिसतात. 

पावसाळा संपण्याचा काळ हा फुलपाखरांचे निरीक्षण करण्यासाठी उत्तम काळ असतो. कारण परिसराचे वातावरण चांगले असते आणि त्यामुळे फुलपाखरांना तिथे चांगले खाद्य उपलब्ध झालेले असते. सकाळी सूर्यकिरणे आकाशात आली की तिथली फुलपाखरे भराऱ्या घ्यायला सुरुवात करतात. 

या भ्रमंतीत आम्हाला चार वेगवेगळ्या विभागातील (family) किमान २० वेगवेगळ्या प्रजातीची फुलपाखरे दिसली. इथल्या परिसरातील फुलपाखरांच्या प्रजाती सामान्य असल्या तरी त्या दिसणे महत्त्वाचे आहे.

Butterfly
Tamil Yeoman Butterfly: गोव्यात बहुतांश देवरायांमध्ये आढळणारा 'खष्ट' वृक्ष, त्यावर दिसणारी 'तमिळ येओमन’ फुलपाखरे

फुलपाखरे परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्याशिवाय अन्नसाखळीतही त्यांचे स्थान महत्त्वाचे असते. फुलपाखरे ही अन्य जीवांची भक्ष्य असतातच परंतु त्याचबरोबर झाडावर असलेले अनेक सूक्ष्म कीटक-किटाणू या फुलपाखरांच्या जीवन चक्रातील सुरवंटांचे भक्ष्य बनत असतात. एका अर्थाने अशा किटाणूंपासून त्या झाडांचे रक्षण हे सुरवंट करत असतात. 

अनेक फुलपाखरे परिसराच्या स्वास्थ्याची निर्देशकही असतात.‌ उदाहरणार्थ, आपले राज्य फुलपाखरू, मलबार ट्री निम्फ, आपल्याला जिथे दिसेल तिथे  जवळपास कुठेतरी पाण्याचा स्त्रोत आहे  हे आपल्याला कळून येते. हा पाण्याचा स्त्रोत नितळ आणि आरोग्यदायी आहे याचेही निर्देशन‌ अशा फुलापाखरांच्या तिथल्या अस्तित्वातून सिद्ध होते.

Butterfly
Apefly Butterfly: अद्भुत! गोव्यातील वांते गावात आढळले 'वानरमुखी फुलपाखरू'

जी झाडे किंवा वनस्पती त्या फुलपाखरांना जगवतात त्या झाडांचे अस्तित्व तिथे आहे याचीही ती एक खूण असते. एका उत्तम परिसराची ओळख अशा प्रकारे आपल्याला ही फुलपाखरे करून देतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com