Omkar Elephant: 'ओंकार' हत्ती पुन्हा गोव्याच्या सीमावर्ती भागात दाखल! वर्षभरात तिसऱ्यांदा आगमन, 25 वर्षांपासूनच्या मानव-हत्ती संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा कधी?

Omkar Elephant Enters Goa: ‘ओंकार’ नावाचा हत्ती पुन्हा गोव्याच्या सीमावर्ती भागात रेंगाळू लागल्याने गोव्यापुढील हत्ती संकटाची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Omkar Elephant Enters Goa
Omkar Elephant GoaDainik Gomantak
Published on
Updated on

‘ओंकार’ नावाचा हत्ती पुन्हा गोव्याच्या सीमावर्ती भागात रेंगाळू लागल्याने गोव्यापुढील हत्ती संकटाची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे. गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा तो गोव्यात दाखल झाला आहे. महाराष्ट्र सरकारने तिळारीच्या खोऱ्यात हत्ती अभयारण्य उभारण्याच्या दृष्टीने मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय घेतला असला, तरी ही संकल्पना प्रत्यक्षात कितपत व्यवहार्य ठरेल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

परिणामी, हत्तींचा मुक्तसंचार रोखून त्यांना मानवी वस्त्या आणि बागायतींपासून दूर ठेवण्याचा कायमस्वरूपी मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही. गेल्या २५ वर्षांपासून गोव्यासह सिंधुदुर्गाला भेडसावणाऱ्या या प्रश्नावर आता तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन तोडगा शोधण्याची वेळ आली आहे.

Omkar Elephant Enters Goa
Goa Land Grabbing Case: जमीन हडप प्रकरणी स्पेशल कोर्टाला घटनात्मक आव्हान; गोवा सरकारला हायकोर्टाची नोटीस, आरोप निश्चितीला स्थगिती

हत्तींना रोखायचे कसे?

सध्या वापरले जाणारे उपाय

हत्ती हटाव मोहीम

गस्तीपथके

ड्रोनद्वारे टेहळणी

फटाके वाजवून हत्तींना हुसकावणे

ग्रामस्थांना सतर्क करणे

नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाई

प्रमुख अडथळे

कुंपण : सुमारे ४० किमी कुंपणाची गरज

खर्च : बॅरिकेडला अंदाजे ₹ २ कोटी प्रतिकिमी; काँक्रीट कुंपण अधिक महाग

खाद्य : सध्याच्या क्षेत्रात हत्तींसाठी पुरेसे नैसर्गिक खाद्य उपलब्ध नाही

जमीन : सुमारे दोन तृतीयांश क्षेत्र खासगी मालकीचे

भूसंपादन : मोठा आर्थिक भार

परवानग्या : केंद्राच्या पातळीवर मंजुरीचे आव्हान

पर्यटन : वन्यजीव संवर्धनाशी सुसंगत स्वतंत्र आराखडा आवश्यक

एकूण खर्च : प्रकल्पाचा खर्च हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक जाण्याची शक्यता

वनविभागाची हतबलता

गस्ती, ड्रोन आणि फटाक्यांपलीकडे पर्याय मर्यादित

हत्तींचे सिंधुदुर्गात आगमन झाल्यापासून मानव-हत्ती संघर्ष सातत्याने वाढत गेला. हा संघर्ष रोखण्याची मुख्य जबाबदारी वनविभागावर आली;

मात्र दीर्घकालीन धोरण आणि ठोस राजकीय पाठबळाअभावी कायमस्वरूपी उपाययोजना आकाराला आल्या नाहीत.

हत्ती संकटाची व्याप्ती

२००२ पासून सिंधुदुर्गात हत्तींचा मुक्काम

सिंधुदुर्गात हत्तींचे आगमन : २००२

सर्वाधिक बाधित क्षेत्र : दोडामार्ग तालुका

आतापर्यंत हत्तींकडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान.

अनेक भागांतील बागायती शेतीच संकटात.

दीर्घकाळ वास्तव्यामुळे हत्तींचा या भागात अधिवास निर्माण होण्याची प्रक्रिया.

सध्या जिल्ह्यात सुमारे सहा हत्तींचा वावर.

हत्तींचे येथे प्रजनन सुरू झाल्याने भविष्यात संख्या वाढण्याची शक्यता.

त्यामुळे आजचा प्रश्न केवळ हत्ती हटविण्यापुरता मर्यादित न राहता मानव-हत्ती संघर्षाचे दीर्घकालीन व्यवस्थापन करण्याचा बनला आहे.

Omkar Elephant Enters Goa
Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

मात्र प्रश्नही मोठे

१ हत्ती पकडून नियंत्रित क्षेत्रात ठेवण्यासाठी केंद्राची परवानगी आवश्यक.

२ अशा प्रकारे हत्तींचे कृत्रिमरीत्या व्यवस्थापन करण्याची उदाहरणे मर्यादित.

३ नव्याने दाखल होणाऱ्या हत्तींना वारंवार पकडून आणणे व्यवहार्य ठरण्याबाबत प्रश्न.

कर्नाटकातील रेल्वे बॅरिकेडच्या अनुभवातून हत्तींचे स्थलांतर मार्ग बदलण्याची शक्यता.

५ एका भागातील संघर्ष रोखताना दुसऱ्या भागात समस्या निर्माण होण्याचा धोका.

कर्नाटक पॅटर्न

रेल्वे रुळांचे बॅरिकेड कितपत प्रभावी?

हत्तींच्या उपद्रवावर कर्नाटकातील हसन जिल्ह्यात रेल्वे ट्रॅक बॅरिकेड कुंपणाचा प्रयोग करण्यात आला.

या कुंपणाची वैशिष्ट्ये

जुने व वापरात नसलेले रेल्वे रूळ वापरले जातात.

रूळ उभे आणि आडवे वेल्डिंग करून मजबूत संरक्षक भिंत तयार केली जाते.

सामान्य सौर कुंपण किंवा चर हत्ती सहज पार करू शकतात.

रेल्वे रुळांचे कुंपण तोडणे किंवा ओलांडणे तुलनेने कठीण.

पारंपरिक कुंपणांच्या तुलनेत देखभालीचा खर्च कमी असण्याचा दावा.

भारतीय विज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार हे कुंपण सुमारे ८० टक्के प्रभावी ठरू शकते.

मात्र धोक्याची दुसरी बाजू

हत्तींचे पारंपरिक स्थलांतर मार्ग बंद होऊ शकतात.

अडथळ्यामुळे हत्ती दुसऱ्या दिशेने मानवी वस्त्यांकडे वळू शकतात.

काही ठिकाणी कुंपण ओलांडण्याच्या प्रयत्नात हत्ती अडकून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना नोंदल्या आहेत.

त्यामुळे कुंपण उभारताना हत्तींचे नैसर्गिक मार्ग अबाधित ठेवणे अत्यावश्यक.

हत्ती रोखण्यासाठी प्रस्तावित तीन प्रमुख पर्याय

पर्याय १

तिळारी हत्ती अभयारण्य

साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रात हत्तींसाठी स्वतंत्र अधिवास

कर्नाटकातून दोडामार्गातील मांगेलीमार्गे सिंधुदुर्गात दाखल झालेले हत्ती तिळारी धरण परिसरातून पुढे मानवी वस्त्यांकडे येतात. त्यामुळे तिळारी परिसरातच हत्तींसाठी स्वतंत्र अभयारण्य उभारण्याचा पर्याय पुढे आला आहे.

Omkar Elephant Enters Goa
Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

प्रस्तावित रचना

तिलारी धरणाच्या परिसरातील सुमारे ५,५०० हेक्टर क्षेत्राचा विचार.

मानवी वस्तीकडे येणाऱ्या बाजूला रेल्वे बॅरिकेड किंवा काँक्रीट भिंत.

नैसर्गिक भौगोलिक रचनेचा संरक्षणासाठी वापर.

कर्नाटक व कोल्हापूरकडील तीव्र उतार, कडे आणि जलाशय यामुळे काही भाग नैसर्गिकरीत्या संरक्षित.

केंद्राची परवानगी मिळाल्यास पर्यटनाशी जोडण्याची शक्यता.

पर्याय २ :

हत्तींसाठी स्वतंत्र संरक्षित क्षेत्र

१५० ते २०० हेक्टरमध्ये नियंत्रित अधिवास

तिलारी अभयारण्यासाठी लागणारा मोठा खर्च, भूसंपादन आणि भौगोलिक अडचणी लक्षात घेता तुलनेने कमी क्षेत्रात स्वतंत्र हत्ती अधिवास विकसित करण्याचा पर्याय विचारात घेता येऊ शकतो.

प्रकल्प कसा असू शकतो?

वस्ती आणि बागायती क्षेत्र कमी असलेल्या भागाची निवड.सुमारे १५० ते २०० हेक्टर क्षेत्र विकसित करणे.

चारही बाजूंनी मजबूत रेल्वे बॅरिकेड किंवा काँक्रीट कुंपण.

पाणवठे निर्माण करणे.

पर्याय ३ :

जंगल समृद्धी

कमी खर्चात आणि तातडीने सुरू करता येणारा उपाय

हत्तींच्या अधिवासातच पुरेसे खाद्य आणि पाणी उपलब्ध करून देणे हा तुलनेने व्यवहार्य पर्याय मानला जाऊ शकतो. दोडामार्ग तालुक्यातील राखीव तसेच खासगी वनक्षेत्रात हत्तींना आवडणाऱ्या खाद्यवनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास बागायती आणि मानवी वस्त्यांकडे होणारा त्यांचा वावर काही प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकतो.

मर्यादा

जंगल समृद्ध होण्यासाठी किमान ५ ते १० वर्षे लागू शकतात.

खासगी वनक्षेत्रात लागवडीसाठी परवानग्या मिळवणे आव्हानात्मक.

हत्तींना एखाद्या विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश पूर्णतः थांबेलच असे नाही.

Omkar Elephant Enters Goa
Goa Tribal Reservation: आरक्षण म्हणजे फक्त आमदारकीची खुर्ची नव्हे; आदिवासींच्या सत्तेतील निर्णायक वाट्याचा लढा

समस्या

या उपाययोजना प्रामुख्याने तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. हत्ती दिवसाढवळ्याही वस्त्यांपर्यंत पोहोचू लागल्याने वनविभागासमोर पर्यायांची कमतरता अधिक प्रकर्षाने जाणवत आहे.

आर्थिक भार

दरवर्षी नुकसानभरपाई आणि गस्तीपथकांवर

मोठा खर्च होत असतानाही संघर्ष कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com