फोटोसेशनपुरती वृक्षलागवड, पण जीर्ण झाडांची जबाबदारी कोणाची?

Dangerous Trees Panaji: झाडं लावताना फोटो, कापताना प्रसिद्धी मिळते. हिच जीर्ण झाडं कुणाच्या घरावर पडली. तर काही योजना आहेत का.
Dangerous Trees Panaji
Dangerous Trees PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

मुद्दा चर्चेतला

झाडं लावताना फोटो, कापताना प्रसिद्धी मिळते. हिच जीर्ण झाडं कुणाच्या घरावर पडली. तर काही योजना आहेत का. म्हणजे आम्ही कल्पना दिली होती, त्यासाठी मरणोत्तर तुमच्या जाहिराती, घरखर्च, पगार इत्यादी गोष्टीची सोय केली जाईल. प्रसिद्धी आणि आयुष्य ह्यांची सांगड स्कीमचे नाव ‘झाडाचे आयुष्य’.

झाडं लावताना फोटो, कापताना प्रसिद्धी मिळते. हिच जीर्ण झाडं कुणाच्या घरावर पडली. तर काही योजना आहेत का. म्हणजे आम्ही कल्पना दिली होती, त्यासाठी मरणोत्तर तुमच्या जाहिराती, घरखर्च, पगार इत्यादी गोष्टीची सोय केली जाईल. प्रसिद्धी आणि आयुष्य ह्यांची सांगड स्कीमचे नाव ‘झाडाचे आयुष्य’.

Dangerous Trees Panaji
Goa Accident: अनर्थ टळला! चालत्या 'कदंबा'च्या छतावर पडले स्टील बार; अनेक प्रवासी जखमी

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासासमोर एक झाड कोसळून अपघात झाला. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले. निसर्ग नियम मान्य करावा लागला. अवकाळी पाऊस थोडा उशिरा पडला. पण एकदाचा पडला. बातम्यांत ठळकपणे नमूद केले की, बाबू कवळेकरांची कार कोरी करकरीत ईव्ही गाडी. वेळ बरी म्हणून मानहानी झाली नाही. निष्ठूर मानव असतो, निसर्ग नाही हे सिद्ध झाले.

आता काही प्रश्न मनात येतात. पणजीत निवडणुका झाल्या. त्या त्या नगरसेवकांनी आपली जबाबदारी उचलली. मेयर त्याप्रमाणे कामाचा आढावा घेत फेरफटका मारत आणि फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत होते किंवा आहेत. झाड कापून झाल्यावर विविध ठिकाणीचे(पणजीचे) फोटो पाहून डोळे भरून आले. कार्य जोरात चालू आहे. धन्य पणजीकर!.

Dangerous Trees Panaji
Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

मला आश्चर्य वाटते की, ही इतकी झाडे कापली तर हे झाड कसं राहणार? असेच आमच्या घरासमोर झाड आहे. आता ते कसे दिसते हे बघायला हवे. ते चित्र पाहून कळेल. हे अतिविशाल झाड ट्रिम केले जाते. ते ही महानगरपालिकेच्या कानीकपाळी लागल्यावर. ते झाड काढायला त्रासदायक आहे हे त्या कार्याला येणाऱ्या माणसाने सुनावले. त्या झाडाला वाळवी लागली आहे. ते झाड कापावे असे वन विभागाला ही कळवले होते. कोणास वासपूस करावी, असे आम्ही महत्वाचे नसल्याने ते जैसे थे, असं झाड आहे.

आता पावसाचे निमित्त पुढे करू नये म्हणून मेयर, नगरसेविका यांना कळवले. यथावकाश मेयरने माणूस दिला. पण मशीन नाही. कदाचित अचानक मुळासकट झाड पडत असल्याने त्या मशीनची गरज तिथे जास्त असेल. त्यावर काय आक्षेप घेणार? ठिक आहे. आम्ही सामान्य जनता त्यात मानहानी झालीच तर सरकार पाच ते एक लाखापर्यंत घरातील लोकांना देतील नुकसान भरपाई. आपली किंमत तेवढीच. गाडी गेली तर नवी घेता येते हे वास्तव.फाईल बंद.

नवी हजारो झाडं कधीतरी जुनी होणार ती कापायला कोण असणार ते बघायला हवं. झाडं लावताना फोटो, कापताना प्रसिद्धी मिळते. हिच जीर्ण झाडं कुणाच्या घरावर पडली. तर काही योजना आहेत का. म्हणजे आम्ही कल्पना दिली होती, त्यासाठी मरणोत्तर तुमच्या जाहिराती, घरखर्च, पगार इत्यादी गोष्टीची सोय केली जाईल. प्रसिद्धी आणि आयुष्य ह्यांची सांगड स्कीमचे नाव ‘झाडाचे आयुष्य’.

Dangerous Trees Panaji
Goa Yellow Alert: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'

बालिशपणा सोडा नी विचार करा खरंच वनखाते लक्ष देते काय अशा झाडाकडे ? त्यांच्या कडे डेटा नसेल पण जी माहिती पत्राद्वारे मिळते ती एका ठिकाणी अपलोड केली तरी चालेल. आता हे झाड पडलं तेव्हा परत ह्या घट्ट कुलूपाची चावी लागते का, ह्याचा प्रयत्न. मागे एकदा हा प्रयोग केला पण फाटक ठिगळ फाटकचं राहिलं.

आता पुन्हा पावसाचं निमित्त आहे. मग झाड उन्मळून पडलं की, पावसातही पडलेल्या झाडांमुळे त्रास होतोय म्हणून त्याची विल्हेवाट कशी होते कुतुहल बाकी अपेक्षित बरंच असतं. परिणामी, परिस्थिती, निर्णय एका बाजूला तर त्याची किंमत भोगायला लागणारा एका बाजूला. आता पेशन्स संपले. जिथे चुकतं तिथे खरं बोलायची ताकद, हिंमत जोडावी लागते.

कारण तो दिवस जवळ आला बिचारी झाडं ‘मारा मारा’ म्हणून झाडाखाली गेली म्हणून श्रद्धांजली वाहतांना म्हणावे लागेल. आम्ही अमर नाही. सारखं व्यवस्थेविरूद्ध झगडा. परत निवडणुका येतील तिच फिल्डिंग, फिक्सिंग ती फिनिशिंग लाईन जवळ होती, तेव्हा रस्त्यावर डांबरीकरण केले. मस्त मेकअप झाला त्या दरम्यान रस्ता खराब होतो, या सबबीमुळे घराबाहेर लोंबकळत असलेल्या वायरींतून वीज आम्हाला मिळाली हेही नसे थोडके. मीटरमध्ये वायरी ओढून ताणून बसवल्या ते फिडर कुठे आहेत ते माहिती नाही. बिल कपात झाली नाही. हेच ‘स्मार्ट’ मीटर असेल तर माझ्यासारखी निर्बुद्ध मीच कारण कारवाई केली, तर वीज नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com