Morjim Turtle Conservation: पर्रीकरांचे स्वप्न वन खात्याच्या दुर्लक्षामुळे अधांतरी! तेमवाडा कासव संवर्धन केंद्राची दुरवस्था; निसर्गप्रेमींमध्ये संताप

Environmental Conservation Goa : तेमवाडा मोरजी समुद्रकिनारी भागात १९९७ सालापासून कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते.
Morjim Turtle Conservation
Morjim Turtle ConservationDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: तेमवाडा मोरजी समुद्रकिनारी भागात १९९७ सालापासून कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते.

तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी या ठिकाणी ५०० चौमी. जागा या कासव संवर्धन मोहिमेसाठी अर्थात अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा आरक्षित केली होती. त्यानुसार या ठिकाणी हंगामी झोपडीवजा अभ्यास केंद्र उभारून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. सध्या या झोपडीकडे वन खात्याचे दुर्लक्ष झाले असून अजूनही अभ्यास केंद्र उभारले गेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

Morjim Turtle Conservation
Morjim Fire: ..मोठी दुर्घटना टळली! मोरजी येथील खिंड गार्डन परिसरात आग, युवकांच्या सतर्कतेमुळे आली आटोक्यात

यंदाच्या हंगामात अजूनही तेमवाडा किनारी भागात कासवांनी अंडी घातलेली नाहीत. ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी या किनाऱ्यावर सागरी कासव येऊन अंडी घालायला सुरुवात करतात. परंतु अजून या ठिकाणी सागरी कासवांचा पत्ताच नाही. तर दुसऱ्या बाजूने अभ्यास केंद्रही उभारले गेले नाही.

Morjim Turtle Conservation
Morjim News: मोरजी किनारपट्टीवर भटक्या गुरांचा धुमाकूळ; वाहतुकीत अडथळा, पर्यटकांना त्रास

वन खात्याचा मनमानी कारभार

या समुद्रकिनाऱ्यावर (Beach) सागरी कासव कधी येतात, किती अंडी घालतात, त्या त्या दिवसाची त्यावेळी अभ्यास केंद्रात माहिती उपलब्ध करून दिली जात नाही. त्यासंदर्भात मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या अभ्यास केंद्रात दरवेळेला तशाप्रकारची माहिती उपलब्ध असेल, असेही स्थानिक पत्रकारांना त्यावेळी सांगितले होते. परंतु या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, त्यांचे म्हणणं आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सागरी कासव आले तर त्याने किती अंडी घातली याची माहिती देऊ नका, असे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com