Ganv Zala Zantto: विश्वविक्रमी ‘गाव जाला जाण्टो'! 5 वर्षाच्या चिमुकलीचाही जागतिक विक्रम

Ganv Zala Zantto World Record: यापूर्वी ‘अलबत्या गलबत्या‘ नाटकाने सहा प्रयोग करून केलेला जागतिक विक्रम, ‘गाव जाला जाण्टो‘ या नाटकाने 18 मे रोजी मोडित काढला. ‘
Ganv Zala Zantto World record
Goa Drama World RecordDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा :‘गोमंतकीय कलाकारांनी खडतर मेहनत घेऊन तयार केलेले ‘गाव जाला जाण्टो‘ या नाटकाने विश्‍वविक्रम केल्यामुळे एक स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान लाभले’ असे मत या नाटकाचे निर्माते आणि प्रसिद्ध नाट्यकर्मी राजदीप नाईक यांनी बोलताना सांगितले. यापूर्वी ‘अलबत्या गलबत्या‘ नाटकाने सहा प्रयोग करून केलेला जागतिक विक्रम, ‘गाव जाला जाण्टो‘ या नाटकाने 18 मे रोजी मोडित काढला. ‘

हे सगळं स्वप्नवत असून, हे सर्व सांघिक प्रयत्नांचे यश आहे’ असेही राजदीप यांनी सांगून, या यशाचे श्रेय प्रेक्षकांना दिले. एकाच दिवशी सात प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात ‘गाव जाला जाण्टो‘ या नाटकाचे तब्बल सात प्रयोग सादर करून या नाटकाने आता ‘वर्ल्ड रेकॉर्ड बूक ऑफ इंडिया‘मध्ये स्थान मिळवले आहे. सकाळी ७.३० ते रात्री उशिरापर्यंत सादर करण्यात आलेले सलग सातही प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे यशस्वी ठरले.

Kala Academy News
Goa Kala AcademyDainik Gomantak

विशेष म्हणजे सातही प्रयोगात वेगळेपणा जाणवता कामा नये, याकडे कटाक्ष ठेवावा लागतो, जो ‘गाव जाला जाण्टो‘ या नाटकातील कलाकारांनी काटेकोरपणे ठेवला आणि नाटक यशस्वी केले. या नाटकात एकूण आठ कलाकार असून कलाकारांंच्या आणि बॅक स्टेज कलाकारांच्या परिश्रमाच्या जोरावर हे नाटक यशस्वी ठरले, असे राजदीप नाईक म्हणाले.

Ganv Zala Zantto World record
Kala Academy: नाटक सुरू असतानाच मध्येच पडला पडदा; शरद पोंक्षेंची व्यवस्थापनेवर सडकून टीका, म्हणाले, "अशीच अवस्था राहिली, तर..."

भूमीचाही वर्ल्ड रेकॉर्ड!

या नाटकात भूमिका करणाऱ्या भूमी नाईक नार्वेकर या पाच वर्षीय मुलीनेही यानिमित्ताने जागतिक विक्रम केला आहे. सर्वांत छोट्या वयाच्या मुलीने सलग सातही प्रयोगात भूमिका साकारल्यामुळे तिच्या भूमिकेची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली आहे.

Ganv Zala Zantto World record
Kala Academy: '9 ते 5 वेळेत नाटक बसवा' ही प्रवृत्ती नाट्यमहाविद्यालयात काय कामाची?

वर्ल्ड रेकॉर्डसाठी काय करावे लागते?

एखाद्या गोष्टीचा जागतिक विक्रम करायचा झाला तर वर्ल्ड रेकॉर्ड बूक ऑफ इंडियाच्यासंकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम आवश्‍यक गोष्टींचा शोध घ्यावा लागतो. हा शोध घेतल्यानंतर आणि नाटकासंबंधी आवश्‍यक माहित संबंधितांना दिल्यानंतर वर्ल्ड रेकॉर्ड बूक ऑफ इंडियाच्या पथकाने जागतिक विक्रम करण्यासाठी अनुमती दिली. नाटक सादर करताना ते अवलोकन करण्यासाठी त्यांचे एक खास पथक राजीव गांधी कलामंदिरात उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com