
Shreyas Talpade on Being the Hindi voice of Pushpa
वाईल्डफायर पुष्पाची सर्वदूर चर्चा सुरु असतानाच मराठी चित्रपट क्षेत्रातील एक महत्वाचा चेहरा म्हणजेच श्रेयस तळपदे अचानक प्रसिद्धच्या झोतात आला आहे. अल्लू अर्जुनाचा पुष्पा एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून हिंदीमध्ये सुद्धा या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं जातंय.
हिंदीमधल्या पुष्पाला प्रेम मिळण्यामागे केवळ अल्लू अर्जुनचाच नाही तर श्रेयस तळपदेचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. का माहितीये? "पुष्पा वाईल्डफायर हैं" असं खणखणीत आवाजात म्हणणारा आणखीन कोणी नसून स्वतः श्रेयस तळपदे आहे.
पुष्पाच्या पहिल्या भागात अल्लू अर्जुनाचा आवाज श्रेयसने डब केला होता आणि आतासुद्धा हिंदी तसेच मराठी प्रेक्षकांसमोर पुष्पाला तेवढ्याच प्रकर्षाने उभं करण्यात श्रेयस यशस्वी झालाय. पुष्पात अल्लू अर्जुनचा आवाज बनणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं श्रेयस म्हणालाय.
अल्लू अर्जुनच्या अभिनयामुळे आणि जगभरातून या चित्रपटाची होणारी चर्चा ऐकून थोडं दडपण आल्याचं श्रेयसने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं, पण प्रेक्षक एवढे प्रेमळ आहे की त्यांनी हा आवाज अल्लू अर्जुनाचा नसून सुद्धा हिंदी चित्रपटावर भरभरून प्रेम केलं.
पुष्पाच्या दुसऱ्या भागात श्रेयसने पुष्पाचं पात्र साकारलं असतं का? असं विचारताच त्याने प्रत्येक अभिनेत्याचा हा ड्रीम रोल असतो असं उत्तर दिलं. सोशल मीडियावर सुद्धा डबिंगचा एक व्हिडीओ शेअर करत श्रेयसने पुष्पाच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं.
अल्लू अर्जुनची एनर्जी त्याला आवाज देताना स्वतःच्या अंगात संचारल्यासारखं वाटतं असं श्रेयसने सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये लिहिलंय. पण गेल्या पाच वर्षांमध्ये पुष्पा १ आणि २ च्या दमदार कामगिरीनंतरही अजून अल्लू अर्जुन आणि श्रेयस तळपदेची भेट झालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.