Fahadh Faasil: "पुष्पा या चित्रपटाने मला काहीही दिलेलं नाही!" चित्रपट गाजतोय मात्र फहाद दिसत नाहीये. असं का?

Fahadh Faasil Reaction on Pushpa: पुष्पा एवढा गाजत असताना सुद्धा फहाद मात्र कुठेच दिसून येत नसल्याने त्याचे चाहते नाराज झालेत
Fahadh Faasil Reaction on Pushpa: पुष्पा एवढा गाजत असताना सुद्धा फहाद मात्र कुठेच दिसून येत नसल्याने त्याचे चाहते नाराज झालेत
Fahadh Faasil Reaction on PushpaDainik Gomantak
Published on
Updated on

अल्लू अर्जुन आणि रश्मीका यांचा बहुचर्चित चित्रपट म्हणजे पुष्पा-२ सध्या बॉक्स ऑफिसवर भलीमोठी कमाई करतोय, पण तुम्हाला माहितेय का या चित्रपटाच्या यशामागे फक्त अल्लू अर्जुन आणि रश्मीका यांचाच हात नाहीये तर आणखीन एका कलाकाराने हा चित्रपट उचलून धरला आणि हा अभिनेता म्हणजे फहाद फसील.

आवेशमनंतर फहाद बऱ्यापैकी हिंदी चित्रपटप्रेमींपर्यंत पोहोचलाय, मात्र सध्या पुष्पा एवढा गाजत असताना सुद्धा फहाद मात्र कुठेच दिसून येत नसल्याने त्याचे चाहते नाराज झालेत. फहाद नसल्याने आता त्याची जुनी मुलाखत बरीच व्हायरल होतेय. हा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांना फहादला मुद्दामून मागे ठेवलंय का असा प्रश्न पडलाय.

पुष्पा १ आणि २ मध्ये फहादने भवरसिंग शेखावत नावाच्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका निभावली आहे . फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीत फहाद म्हणाला होता की भवरसिंगच्या भूमिकेमुळे किंवा पुष्पाच्या यशामुळे माझ्यावर काही मोठा परिणाम झालेला नाही.

Fahadh Faasil Reaction on Pushpa: पुष्पा एवढा गाजत असताना सुद्धा फहाद मात्र कुठेच दिसून येत नसल्याने त्याचे चाहते नाराज झालेत
Pushpa 2 Box Office Collection: "वाइल्ड फायर पुष्पा को फ्लॉवर समझे क्या"? केवळ 48 तासांत 400 कोटींचा टप्पा पार करणारा पहिला भारतीय चित्रपट

चित्रपटाला किंवा चित्रपटाच्या टीमला न दुखावता त्याने एक खूप मोठं विधान केलं होतं, या चित्रपटाने त्याच्यासाठी काहीही विशेष केलेलं नाही आणि हेच थेट तो दिग्दर्शक सुकुमारशी बोलल्याचं देखील फहाद म्हणाला होता.

आपल्या चाहत्यांना एक संदेश देताना फहाद म्हणाला होता की, "पुष्पामुळे माझ्या आयुष्यात काही मोठे बदल होणार असतील अशी अपेक्षा असल्यास असं काहीही होणार नाहीये. मला पॅन-इंडियन स्टार होण्यापेक्षा माझ्या चित्रपटांचं यश जास्ती महत्वाचं आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com