पहिल्यांदाच गाजवणार 'तेलगू' सिनेसृष्टी! अक्षय खन्ना साकारणार अजेय शुक्राचार्य; अंगावर शहारे आणणारा लूक Viral

Akshaye Khanna Telugu debut: प्रशांत वर्मा यांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्समधील या महत्त्वपूर्ण चित्रपटात अक्षय खन्ना चक्क 'असुरगुरु शुक्राचार्य' यांची भूमिका साकारताना दिसेल
Akshaye Khanna Telugu movie
Akshaye Khanna Telugu movieDainik Gomantak
Published on
Updated on

Mahakali movie Akshaye Khanna: आदित्य धरच्या 'धुरंधर' चित्रपटातील 'रेहमान डकैत' या पात्राने अक्षय खन्नाला पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलेय. या यशाच्या लाटेतच अक्षयच्या आगामी 'महाकाली' या भव्य पौराणिक चित्रपटाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. प्रशांत वर्मा यांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्समधील (PVCU) या महत्त्वपूर्ण चित्रपटात अक्षय खन्ना चक्क 'असुरगुरु शुक्राचार्य' यांची भूमिका साकारताना दिसेल.

शुक्राचार्यांच्या अवतारात अक्षयचा थरार

'महाकाली' चित्रपटातील अक्षय खन्नाचा 'फर्स्ट लूक' सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. लांब पांढरी दाढी, डोक्यावर बांधलेली जटा आणि अंधारात चमकणारे तेजस्वी पांढरे डोळे, अशा रौद्र रूपात अक्षय खन्नाला ओळखणेही कठीण झाले आहे.

शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु, मृत संजीवनी मंत्राचे संरक्षक आणि अजेय रणनीतीकार मानले जातात. ही भूमिका अक्षयच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक आणि वेगळी भूमिका ठरेल, अशी चर्चा चित्रपट वर्तुळात रंगली आहे.

प्रशांत वर्मा यांचे 'सुपरहिरो' विश्व

'हनुमान' चित्रपटाच्या तुफान यशानंतर दिग्दर्शक प्रशांत वर्मा आता 'महाकाली'च्या माध्यमातून भारताची पहिली 'फिमेल सुपरहिरो' सादर करत आहेत. अभिनेत्री भूमी शेट्टी यामध्ये देवी कालीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट केवळ पौराणिक कथेवर आधारित नसून, त्यामध्ये वर्णभेद, आंतरिक शक्ती आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास अशा आधुनिक विषयांची गुंफण करण्यात आली आहे.

Akshaye Khanna Telugu movie
अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि २०२६ ची प्रतीक्षा

'धुरंधर'मधील क्रूर गँगस्टर आणि आता 'महाकाली'मधील विद्वान ऋषी, अशा दोन टोकाच्या भूमिका अक्षय खन्ना इतक्या सहजतेने साकारत असल्याने चाहते थक्क झाले आहेत. अनेकांनी त्याच्या या लूकची तुलना 'कल्की २८९८ एडी'मधील अमिताभ बच्चन यांच्या 'अश्वत्थामा' लूकशी केली जातेय.

पूजा अपर्णा कोल्लुरू दिग्दर्शित हा चित्रपट २०२६ च्या सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, अक्षयचा हा 'असुरगुरु' अवतार पाहण्यासाठी प्रेक्षक आतापासूनच आतुर झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com