बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी दिला असला तरी त्यांचे तृणमूल पक्षात (Trinamool Congress) जाणे निश्चित असल्याचे सांगितले जाते.
बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी दिला असला तरी त्यांचे तृणमूल पक्षात (Trinamool Congress) जाणे निश्चित असल्याचे सांगितले जाते.Dainik Gomantak

चर्चिलचा तृणमूल जुगार यशस्वी होणार?

तुम्ही तृणमूलमध्ये (Trinamool Congress) जाण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे का असे विचारले असता, माझा कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच मी शेवटचा निर्णय घेणार आहे.
Published on

मडगाव: काँग्रेस - राष्ट्रवादी (Congress - NCP) या दोन्ही पक्षांत युती होणार की नाही, हे 29 नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट करावे. अन्यथा मी माझा निर्णय घ्यायला मोकळा आहे, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी दिला असला तरी त्यांचे तृणमूल पक्षात जाणे निश्चित असल्याचे सांगितले जाते. मात्र, तृणमूलमध्ये (Trinamool Congress) जाण्याचा जुगार त्यांच्या अंगावर उलटण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी दिला असला तरी त्यांचे तृणमूल पक्षात (Trinamool Congress) जाणे निश्चित असल्याचे सांगितले जाते.
तृणमूल काँग्रेसकडे खाणसम्राटही आकर्षित!

स्वतःला बाणावलीत आणि कन्या वालंका हिला नावेलीत उमेदवारी द्यावी, ही अट आलेमाव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना घातली आहे. मात्र, त्यांची ही अट मान्य होणे अशक्य असल्याने ते पक्षाला रामराम करण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याने सांगितले.

यासंदर्भात आलेमाव यांना विचारले असता, मी आणि माझी कन्या, दोघेही विधानसभा निवडणूक लढविणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी कुठे असेन, तिथे ती असेल, असे त्यांनी सांगितले.

तुम्ही तृणमूलमध्ये जाण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे का असे विचारले असता, माझा कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच मी शेवटचा निर्णय घेणार आहे. पण ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व तृणमूल या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढवावी अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले.

बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी दिला असला तरी त्यांचे तृणमूल पक्षात (Trinamool Congress) जाणे निश्चित असल्याचे सांगितले जाते.
चर्चिल आलेमाव यांची तृणमूल प्रवेशासाठी बाणावलीत चाचपणी

काँग्रेसकडे आम्ही युतीचा प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी ठेवला होता. पण अजूनही त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर मिळत नाही. गिरीशसारखे स्थानिक नेते आम्हाला कुणाशीही युती करायची नाही, अशी वक्तव्ये करतात. काँग्रेस पूर्वीसारखा मजबूत पक्ष राहिलेला नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. उगाच त्यांनी तोऱ्यात वावरू नये, असे चर्चिल म्हणाले.

  • चर्चिल तृणमूलमध्ये जाणे आणि निवडणूक लढविणे त्यांच्यासाठी एक जुगार ठरू शकतो, असेही सांगितले जात आहे.

  • कारण बाणावली मतदारसंघात ‘आप’ने आधीच जागा तयार केली असून वेंझी व्हिएगस यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

  • चर्चिल राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यास काँग्रेस मिकी पाशेको यांना बाणावलीत उतरविणार आहे. यापूर्वी मिकीने चर्चिल यांचा बाणावलीत पराभव केला होता.

  • त्याशिवाय सध्या बाणावलीत तृणमूलचे संभाव्य उमेदवार म्हणून काम सुरू केलेले तियात्रिस्त टोनी डायस हेही तृणमूलची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरू शकतात.

  • अशा स्थितीत आलेमाव यांना ही निवडणूक बरीच जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com